प्रशांत भोपळे/प्रतिनिधी हिवरखेड...
तेल्हारा माळेगाव नाका ते पी.पी. पाटील पेट्रोल पंप या मार्गावरील अपूर्ण रस्त्याबाबत नागरिक, व्यावसायिक, शालेय विद्यार्थी व वाहनधारकांना गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता रस्त्यावर पडलेल्या गिट्टीनमुळे अनेक अपघात झाले याला वाचा फोडण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकार यांनी १ नोव्हेंबरला रस्त्यामध्ये खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केले असता तब्बल चार तासाच्या आंदोलनामुळे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या व वाहतूक विस्कळीत झाली होती या आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन लेखी आश्वासन दिल्यामुळे लगेच कामाला सुरुवात झाल्यानंतर विशाल नांदोकार यांनी आपले आंदोलन मागे घेतले.या रस्त्याच्या समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विशाल महादेव नांदोकार यांनी २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कार्यालय, तेल्हारा येथे निवेदन सादर केले होते. या निवेदनात रस्ता लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, ८ दिवसांत काम सुरू न झाल्यास नागरिकांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. नांदोकार यांनी दिलेल्या निवेदनात तेल्हारा-आळसुळ मार्ग, तेल्हारा-वरवट मार्ग आणि तेल्हारा - हिवरखेड मार्ग हे प्रमुख मार्ग असल्याचे नमूद केले होते. या मार्गांवरील वाहतूक, विद्यार्थ्यांची शाळा-वाहतूक आणि व्यापारी वर्गाच्या मालाची वाहतूक याच रस्त्याने होत असते त्यामुळे या रस्त्या वर वाहनचा वेग वाढत असेल यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असून संबंधित रस्त्यावर वेग कमी करण्यासाठी रस्त्यावर लहान लहान गतिरोधक लावणे आवश्यक आहे ही मागणी सुद्धा या निवेदनात होती. निवेदनात दिलेली मुदत आल्यावर सुद्धा रस्त्याच्या कामास सुरुवात झाली नव्हती त्यामुळे नांदोकार यांनी रस्त्याच्या मधोमध खड्डा खोदून त्यामध्ये बसून आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी शासन खडबडून जागे झाले. व या निवेदनावर कार्यवाही करत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, तेल्हारा यांनी तत्काळ प्रतिसाद दिला आहे. उपविभागीय अभियंता धनराज अ. बरडे यांनी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे संबंधित कंत्राटदार कंपनीला निर्देश दिले आहेत की, ३१ मार्च २०२६ पूर्वी हे काम पूर्ण करावे आणि अपूर्ण रस्ता तात्काळ पंधरा दिवसाच्या आत दुरुस्त करावा. तसेच, कामाच्या वेगात सुधारणा करून मार्ग सुस्थितीत आणावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.या निर्णयामुळे तेल्हारा शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकार यांनी प्रशासनाचे आभार मानत सांगितले की, “आमच्या मागणीवर त्वरीत कारवाई करून रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हे काम गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे. परंतु पंधरा दिवसात काम पूर्ण न झाल्यास 16 नोव्हेंबरला समाधी आंदोलन करणार आहेअसा इशारा त्यांनी दिला आहे .या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी राजकीय पातळीवर नाराजीचे सूर उमटत आहेत. आमदार प्रकाश भाळसाकळे महोदय शहरात अनेक कामांच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते, मात्र नागरिकांच्या आंदोलनाच्या मागणीसंदर्भात त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, “आमदार व भाजपला नागरिकांच्या अडचणींशी काहीही देणेघेणे नाही,” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
