अतिविषारी कोब्रा जातीच्या सापाला सर्पमित्र शरद जाधव यांनी दिली जीवनदान...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद शहरातील गोविंद पुऱ्यातील सौरभ तायडे यांच्या घरामध्ये दिनांक १ नोव्हेंबरच्या रात्री साडेबाराच्या सुमारास भला मोठा साप आढळून आल्याने जळगाव शहरातीलच सर्पमित्र अभिजीत तायडे व सर्पमित्र शरद जाधव यांना बोलावून घेतले. त्यावेळी सर्पाला पाहताक्षणीच सर्पमित्र शरद जाधव यांनी अति विषारी कोब्रा जातीचा नाग असल्याचे सांगितले.त्यावेळी सर्पमित्र शरद जाधव व अभिजित तायडे यांनी मोठ्या कसरतीने कोब्रा जातीच्या सापाला पकडले यावेळी तेथील रहिवाशांनी दोन्ही सर्पमित्रांचे आभार मानले. तेवढ्या रात्रीच जवळपास दीड वाजता सर्पमित्र शरद जाधव व अभिजित तायडे यांनी कोब्रा जातीच्या सापाला मानवी वस्तीच्या दूर जंगलात सोडून जीवनदान दिले.
