वरवट बकाल येथे 2 देशी कट्टे व चार जिवंत काढतूससह एक आरोपी ताब्यात .!बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा पथकाची तामगाव पोस्टे हद्दीत कारवाई !


 वरवट बकाल येथे 2 देशी कट्टे व चार जिवंत काढतूससह एक आरोपी ताब्यात .!बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा पथकाची तामगाव पोस्टे हद्दीत कारवाई ! 

अनिल भगत/बुलढाणा....

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत एका आरोपीकडून 2 देशी कट्टे व चार जिवंत काढतूससह एकूण 84 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.सदर कारवाई आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी वरवट बकाल येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून करण्यात आली आहे.या प्रकरणात नांदेड येथील एका तरुणांना अटक करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे एका आरोपीकडून दोन देशी कट्टे व चार जिवंत काडतुसे अशा एकूण 84 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये पवन वासुदेव कोकाटे वय 34 वर्ष रा.नांदेड असे आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षकह बुलढाणा अमोल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक खामगांव श्रेणिक लोढा  यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांचे आदेशाने आज  पोलीस स्टेशन तामगाव हद्दीत आर्म ऍक्ट ची कलम 3, 25,प्रमाणे खालील प्रमाणे  कारवाई करण्यात आली.सदर कारवाई PSI पंकज सपकाळे, एजाज खान,अमोल शेजोळे,अजीस परसुवाले,शिवानंद हेलगे यांच्या पथकाने केली आहे.सदर प्रकरणी पोलीस स्टेशन तामगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तामगाव पोलिस करीत आहेत.

Previous Post Next Post