जळगाव जामोद प्रतिनिधी...
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा सेवा संचालनालय पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत दिनांक ३० ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे संपन्न झालेल्या, अमरावती विभाग स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये गोळा फेक या क्रीडा प्रकारात १७ वर्षे वयोगटातून पिंपळगाव काळे येथील बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात , इयत्ता ११ वी कला शाखेचा विद्यार्थी फिरोज अकबर सोले या विद्यार्थ्यांने ११.९२मीटर गोळा फेकून विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. या यशा मुळे त्याची राज्य स्तरावर होणाऱ्या गोळा फेक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.फिरोज सोलेच्या या नेत्र दीपक यशा मुळे संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुंबई येथील सर जे. जे. ग्रँट मेडिकल कॉलेज चे माजी अधिष्ठाता तथा गुणश्री प्राध्यापक डॉ.साडीक पटेल साहेब यांनी फिरोज सोलेचे या यशा बद्दल अभिनंदन करून त्याला पुढील राज्य स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.सलीम पटेल, यांनी सुद्धा फिरोज सोलेचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर संस्था उपाध्यक्ष प्रा.कय्युम पटेल , सचिव विजय अंभोरे ,सहसचिव रब्बानी देशमुख , संचालक सिराजोद्दीन पटेल, तथा प्राचार्य मुकुंद इंगळे सर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शेख फराह,तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी फिरोज सोलेचे अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक प्रा .जे यू कचवे यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले.
