राजु भास्करे/ अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील गांगरखेडा ग्रामपंचायतीत सरपंच पदावरून मोठी राजकीय उलथापालथ घडली होती. ग्रामपंचायतीतील दहा सदस्यांपैकी आठ सदस्यांनी सरपंच विमल तानू बेठेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या वेळी सरपंच यांच्या सोबत फक्त एकच सदस्य होता.मात्र या अविश्वास ठरावानंतर झालेल्या थेट जनमत मतदानात जनतेने सदस्यांच्या भूमिकेला नाकारत सरपंच विमल ताई बेठेकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला.या निवडणूक प्रक्रियेत एकूण २६२ मतदारांची नोंदणी होती. त्यापैकी २४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४१ मते अवैध (NOTA) ठरली.अविश्वासाच्या बाजूने ९७ मते पडली, तर सरपंच पद कायम ठेवण्यासाठी १११ मतांनी बहुमत मिळवत विमल ताई बेठेकर पुन्हा विजयी ठरल्या.या निकालाने ग्रामपंचायतीतील सदस्यांना मोठा धक्का बसला असून गावातील जनतेने सरपंचांवरील विश्वास कायम ठेवत पुन्हा त्यांच्या बाजूने मतदान केल्याने बेठेकर ताईंचा जनाधार अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विजयानंतर सरपंच विमल ताई बेठेकर यांनी सांगितले की,गावकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाचे मी ऋण विकासकामांच्या माध्यमातून फेडेन. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व सर्व समाजघटकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे.या मतदान प्रक्रियेदरम्यान विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये गट विकास अधिकारी – विनोद खेडकर सर,सहायक गट विकास अधिकारी – महेश वाढई,विस्तार अधिकारी – विठ्ठल जाधव, रंजना पाटोदे, प्रज्वल थेलकर,सहाय्यक प्रशासन अधिकारी – सुभाष जाधव,तसेच पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, श्रीकांत खानंदे, हर्षल काले,हेड कॉन्स्टेबल मनोज देशमुख, समीक्षा मुळे, निलेश तोटे व पंचायत समिती, महसूल व पोलीस विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.निकालानंतर गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांनी सरपंचांचा सत्कार करून आनंदोत्सव साजरा केला.
