सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
नांदुरा येथील तहसीलदार व जलंब येथील ठाणेदार यांच्या पथकाने भोटा शिवारातील असलेल्या पूर्णा नदीपात्रातून विनापरवाना अवैध रित्या रेतीचा उपसा करणारी केनी व ट्रॅक्टर पकडले असून 3 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन उपसा करणारी केनी व ट्रॅक्टर जलंब पोस्टेला जमा करण्यात आले आहे. सदर घटना दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास भोटा येथे घडली..नांदुरा तालुक्यातील भोटा शिवारातील पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रित्या रेतीचा उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती नांदुरा येथील तहसीलदार यांच्या पथकाला मिळाली. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी तातडीने भोटा शिवारातील पूर्णा नदीपात्रामध्ये जाऊन नदीपात्रातून अवैध रित्या रेतीचा उपसा करणाऱ्या विष्णू मनोहर घुळे वय 27 वर्ष रा. भोटा याला नदीपात्रातून अवैध रित्या रेतीचा उपसा करताना पकडले व त्याच्या ताब्यातून 1 लोखंडी केनी,ट्रॅक्टर तसेच 2 ब्रास रेती आदी साहित्यसह एकूण 3 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल रंगेहात पकडला आहे. सदर आरोपीला रेती उत्खनन व वाहतूक करण्याबाबत परवाना विचारला असता त्याने कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले .याबाबतची तक्रार दिलीप जाधव ग्राम महसूल अधिकारी भोटा यांनी जलंब पोस्टेला दिली यावरून पोलिसांनी आरोपी विष्णू घुळे विरुद्ध अप नं. 273/2025 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वे गुन्हा दाखल केला आहे..सदर कारवाई नांदुरा तहसीलदार अजित जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मार्कंड साहेब, मंडळ अधिकारी ऐनवार साहेब, ग्राम महसूल अधिकारी दिलीप जाधव, तलाठी मंदार पवार, जलंब पोस्टेचे ठाणेदार अमोल सांगळे,रायटर रवींद्र गायकवाड,चालक मसने आदींनी केली आहे..
अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्याविरुद्ध यापुढे महसूल, पोलीस व परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात येईल.पर्यावरण मान्यता प्राप्त वाळू घाटांचे सध्या लिलाव प्रक्रिया सुरू असून वाळू व्यवसायामध्ये स्वारस्य असल्यास रितसर वाळू घाट लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा.अवैध रित्या रेतीचा उपसा करणाऱ्या विरुद्ध यापुढे अशाच प्रकारे कारवाई सुरू ठेवण्यात येईल.
अजितराव जंगम
तहसीलदार नांदुरा
