जळगाव जामोद प्रतिनिधी....
"संकटात संधी शोधणे आणि प्रत्येक आव्हानाला विजयात रूपांतरित करणे," ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची खरी ओळख आहे. आज जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली.विरोधकांनी, विशेषतः काँग्रेस पक्षाने, तांत्रिक बाबींचा आधार घेत भाजपाच्या दोन उमेदवारांचे अर्ज बाद करण्याचा जो कुटिल प्रयत्न केला, त्याला भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी सडेतोड उत्तर देण्याचे ठरवले आहे. अर्ज बाद करून भाजपाला रोखण्याचे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवण्यासाठी भाजपाने प्रभाग क्रमांक ७ ब मध्ये मोठी राजकीय खेळी खेळली आहे.प्रभाग क्रमांक ७ ब मधील भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना आणि प्रचंड उत्साह लक्षात घेता, पक्षाने या प्रभागातील अपक्ष उमेदवार आफरीन नाज नईमउल्लाह खान यांना अधिकृत पाठिंबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांची राजकीय प्रगल्भता आणि जिद्द पाहून पक्षाने हा "वैचारिक निर्णय" अंमलात आणला आहे.या निर्णयानुसार, आज आफरीन नाज यांनी माजी मंत्री आ. संजयजी कुटे साहेब आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. यामुळे आता त्या भाजपा पुरस्कृत उमेदवार म्हणून रिंगणात असतील.भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आणि मतदाराने खालीलप्रमाणे मतदान करून विरोधकांना आपली ताकद दाखवून द्यायची आहे असे आवाहन यावेळी आमदार डॉ.संजय कुटे यांनी केले.
१. नगराध्यक्ष पद: उमेदवार गणेश दांडगे (निशाणी: कमळ)
२. प्रभाग क्र. ७ (अ): उमेदवार सुनील रघुवंशी (निशाणी: कमळ)
३. प्रभाग क्र. ७ (ब): भाजपा पुरस्कृत उमेदवार आफरीन नाज (निशाणी: बॅट)
काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणाला विकासाच्या राजकारणाने उत्तर देण्यासाठी, आणि जळगाव जामोदच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या तिन्ही उमेदवारांच्या निशाणी समोरील बटण दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात येत आहे.
