चूर्णीची कराटे स्टार जागृती वरखडेचा डंका.अमृतसर ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड व सिल्वर जिंकत महाराष्ट्राचा गौरव!


चूर्णीची कराटे स्टार जागृती वरखडेचा डंका.अमृतसर ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड व सिल्वर जिंकत महाराष्ट्राचा गौरव!

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमृतसर (पंजाब) येथे माधव विद्या निकेतन सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये ८ व ९ नोव्हेंबर रोजी World United Sports Karate Organisation तर्फे All India Open Karate Championship चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्पर्धेत उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, असम, राजस्थान, महाराष्ट्र अशा सुमारे सात राज्यांतील खेळाडूंनी दमदार सहभाग नोंदवला.महाराष्ट्रतर्फे महाराष्ट्र स्पोर्ट कराटे अकादमी, नागपूर संघाने सहभाग घेतला होता. संघाला सेंसई मिलिंद शिरपूरकर (अध्यक्ष), सेंसई आशीष कांबले (हेड कोच) आणि सेंसई सरगम नागफटे (हेड कोच) यांचे मार्गदर्शन लाभले.महाराष्ट्राच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ३६ पदके (स्वर्ण, रौप्य आणि कांस्य) पटकावत स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तर दिल्लीने विजेतेपद मिळवले.याच स्पर्धेत चिखलदरा तालुक्यातील चूर्णी गावची कन्या जागृती (विधी) शशिकांत वरखडे हिने आपल्या अप्रतिम कौशल्याने एक सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकत महाराष्ट्राचा झेंडा उंचावला.कठीण स्पर्धेत विविध राज्यांतील बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत जागृतीने आत्मविश्वास, शिस्त आणि चिकाटीचे प्रभावी प्रदर्शन केले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे चूर्णी गावासह संपूर्ण चिखलदरा तालुक्यात आनंद आणि अभिमानाचे वातावरण आहे.जागृतीने आपल्या या विजयाचे संपूर्ण श्रेय आपल्या गुरुजनांना, पालकांना व कुटुंबाच्या पाठिंब्याला दिले.तिने सध्याच्या पिढीतील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत सांगितले—“अभ्यासासोबत खेळालाही तितकीच महत्त्व द्या. आणि मुली कमजोर नसतात… करून दाखवतील तेव्हा जग ओळखेल!”जागृतीची ही उंच भरारी अनेक ग्रामीण मुलींसाठी प्रेरणेचा दीप ठरत आहे.

Previous Post Next Post