राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्हा तिवसा तालुक्यातील भांबोरा ते आखदवाडा हा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक व शेतकरी बांधवांनी केली आहे.भांबोरा ते आखतवाडा हा रस्ता नागरिकांना ये-जा करण्यासाठी विशेषता शेतकऱ्यासाठी चांगलाच जिकिरीचा ठरत आहे.या रस्त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.काही वर्षांपूर्वी भांबोरा ते अमदाबाद या रस्त्याचे गजानन पोलाड (लघु कालवा पुलापर्यंत) यांचे शेताचे कॉर्नर ते पुढे आमदाबाद असे डांबरीकरण झाले होते.परंतु कालवा पुलाचे पलीकडील अर्थात आखदवाडा रस्त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेले. त्या रस्त्याची डागडुजी तर बरेच बरे साधे रस्त्याच्या कडेवरील झाडे झूडपी सुद्धा कापलेली नाही.इतकी दुरावस्था या रस्त्याची आहे.भांबोरा-आमदाबाद रस्त्याचे काही वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले असले तरी आता हा रस्ता सुद्धा पूर्णपणे खराब झाला आहे. जागोजागी खड्डे पडले आहे.गिट्टी उखाडलेली आहे त्यामुळे शेतकरी व लोकांना ये-जा करणे तसेच वाहन चालवीने त्रासदायक ठरत आहे. शेतकरी बांधवांना तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या मार्गावरील शेतकऱ्यांना आपल्या शेतातून शेतमालाची ने-आण करता येत नाही.पेरणीचे वेळी तर पेरणी साहित्य व यंत्रे नेण्यासाठी फार जिकरीचे ठरले आहे.पावसाळ्यात तर या रस्त्याने साधी ये-जा करणे सुद्धा अवघड आहे.गजानन पोलाड यांचे शेताचे कॉर्नर पर्यंत कसे बसे वाहने वा शेतमालाची वाहतूक करणे ठीक आहे परंतु गजानन पोलाड यांचे शेतापलीकडील शेतकऱ्यांना साधे येणे जाणे करणे कठीण आहे तर शेतमालाची ने-आण आणि पेरणीसाठी ट्रॅक्टर वा बैलजोडी कशी न्यायची असा प्रश्न आहे.हा रस्ता पूर्णपणे झाडा-झुडपाने माखलेला आहे. त्यामुळे मालाचे वाहतुकीसाठी आणि पेरणीसाठी पर्यायी मार्ग शोधावा लागतो. आजूबाजूचे शेतातून जावे लागते.पर्यायी मार्ग म्हणून शेतकऱ्यांनी मज्जाव केल्यास शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी असा प्रश्न उपस्थित होतो.या शिवारातील शेतकऱ्यांना पर्यायाने शेतकरी व नागरिकांचे सोयीसाठी संबंधित विभागाने या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी या भागातील शेतकरी शंकरराव इंगळे, रामदास पोलाड,अनिकेत पोलाड,विनोद खडतकर,सुजित पोल्लाड,प्रशांत पोलाड संतोष पोलाड इत्यादींनी केली आहे.
शंकरराव इंगळे भांबोरा
करिमाबाद शिवारातील विशेषतः लघू कालवा कॉर्नर पुढील आखदवाडा मार्गवरील शेतकऱ्यांसाठी हा एकमेव मार्ग आहे. ये-जा करण्यासाठी हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे दरवर्षी पेरणीचे वेळी विशेषतः पावसाळ्यात शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. म्हणून पक्का रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे असे मत शेतकरी शंकरराव बारकुजी इंगळे भांबोरा यांनी व्यक्त केले आहे.
अनिकेत पोलाड युवा शेतकरी
करीमाबाद शिवारातील प्रामुख्याने आखतवाडा रस्त्यावरील शेतकऱ्यांना पर्यायी मार्ग नसल्यामुळे बरेचसे शेतकरी माझ्या शेतातून वाहने टाकतात.कधीकधी उभ्या पिकातून वाहने टाकतात त्यामुळे माझे दरवर्षी शेतमालाचे नुकसान होते.त्यामुळे हा रस्ता दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधीनी ह्याकडे लक्ष केंद्रित करून रस्ता दुरुस्ती करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे मत युवा शेतकरी अनिकेत गजानन पोलाड यांनी व्यक्त केले.
