बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
अकोट मधील नामांकित गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा बिल्डर मुन्ना उर्फ शशिकांत बजरंगलाल अग्रवाल याच्यासह दोन अज्ञात इसमावर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत विनयभंग, जीवे मारण्याचा प्रयत्न व अॅक्ट्रासिटी ॲक्ट नुसार गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत .त्यामध्ये बी एन एस 2023 चे कलम ११५ (२),३५२,३(५),३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va) प्रमाणे शेगाव पोलिसांनी नोंद करून आरोपी मुन्ना अग्रवाल सह इतर अज्ञात दोघांचा शोध सुरू केला आहे मुन्ना अग्रवाल हा शहरातून फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत या घटनेची पार्श्वभूमी पाहता अकोट मधील शिंदे सेनेचा उपजिल्हाप्रमुख असलेला क्लब माफिया मनिष रामाभाऊ कराळे, वरली किंग राजेश साळुंके व प्रसन्न जवंजाळ यांनी 20 ऑक्टोबरला येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका महिलेला तिच्या पतीसह जबर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ विनयभंगाच्या आरोपाखाली अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलीस स्टेशनला बी एन एस २०२३ प्रमाणे ७४,३५२,३(५) नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी या माफियांचा पाळलेला वरली बहाद्दर सुमित उर्फ विकी मनोहर वानखडे याने आपल्या "आका"प्रति इमानदारी दाखवण्यासाठी पीडित महिलेवर दबाव आणून धमकावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या विरुद्ध सुद्धा 22 ऑक्टोबरला अकोला सिविल लाईन पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला पुन्हा हाच प्रयत्न मुन्ना उर्फ शशिकांत अग्रवाल याने केला या माफियांसोबत आर्थिक हितसंबंध जोपासणारा बिल्डर अग्रवाल या माफीयांच्या प्रेमात बळी पडला मुन्ना अग्रवाल ला बुलढाणा पोलीस रात्रंदिवस शोधत आहेत त्यामुळे अग्रवाल चे या माफियांसोबत कशा प्रकारचे हितसंबंध होते या माफीयांना आर्थिक पुरवठा अग्रवाल कडून मिळत होता का ? या बिल्डरला माफियांना हाताशी धरून कुणाचा काटा काढायचा होता किंवा या बिल्डरवर माफियांची दहशत होती का? हा बिल्डर या माफीयांना बळी का पडला असावा माफियांना वाचवण्यासाठी बिल्डर कडून एवढी धडपड का ? बिल्डर ने महिलेचा विनयभंग करून जीव घेण्याचा प्रयत्न का केला असावा? या बिल्डरचे मानसिक संतुलन बिघडले का? असे अनेक प्रश्न या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत यापुढे मुन्ना अग्रवाल ला अटक करून मनिष कराळे सह राजेश साळुंके व प्रसन्न जवंजाळ वर बुलढाणा पोलीस कोणती कारवाई करतात याकडे अमरावती, अकोला व बुलढाणा या तीनही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
