मेळघाटच्या सोमवारखेडा येथे श्रमदान व लोकसहभागातुन अनेक कामे राबविण्यात आले.अनोख्या पद्धतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान...


 मेळघाटच्या सोमवारखेडा येथे श्रमदान व लोकसहभागातुन अनेक कामे राबविण्यात आले.अनोख्या पद्धतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

एखाद्या शासकीय कार्यक्रमाला घराघरांतील आबालवृद्ध पहाटे ५ वाजता उठावे, घरापुढे सडासंमार्जन करून रांगोळी टाकावी आणि अख्ख्या गावाची स्वच्छता करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवावा असा हा अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील सोमवारखेडा ग्रामपंचायत गावातील येथील प्रसंग सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.दि .८/११/२०२५ ला शनिवारी सोमवारखेडा येथे सरपंच मन्सांराम ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान व लोकसहभागातुन अनेक कामे केली आहे. ग्रामपंचायत व  प्रशासनाला गावकऱ्यांची जोड असली की, विकास होतो. त्याचा प्रत्यय सोमवारखेडा ग्रामपंचायतीमध्ये आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत आला .त्याच प्रमाणे सोमवारखेडा गावांमध्ये समाधान शिबिर घेण्यात आले असुन या शिबिरात शाळेकरी मुलांना जातप्रमाण पत्राचे वाटप करण्यात आले आहे.यामध्ये सरपंच मन्सांराम ठाकरे , उपसरपंच गंगुबाई शेलुकर, सदस्य दादाराव ठाकरे ,सौ.जसमाय ठाकरे,राजपाल ठाकरे,मानकु ठाकरे, सौ.कमला भास्कर,  सचिव रेखा पाखरे,पो.पा.राजु काळे,बापु ठाकरे,सोनकलाल ठाकरे, मुख्याध्यापक खोजरे सर,साखरकर सर,समुदाय आरोग्य अधिकारी झाळकर साहेब हे असुन गावातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post