राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
एखाद्या शासकीय कार्यक्रमाला घराघरांतील आबालवृद्ध पहाटे ५ वाजता उठावे, घरापुढे सडासंमार्जन करून रांगोळी टाकावी आणि अख्ख्या गावाची स्वच्छता करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवावा असा हा अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार ग्रामपंचायत गावातील येथील प्रसंग सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.गौलखेडा बाजार येथे सरपंच रामेश्वर चिमोटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान व लोकसहभागातुन अनेक कामे केली आहे. ग्रामपंचायत व प्रशासनाला गावकऱ्यांची जोड असली की, विकास होतो. त्याचा प्रत्यय गौलखेडा बाजार ग्रामपंचायती मध्ये आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत आला .त्याच प्रमाणे गौलखेडा बाजार जिल्हा परिषद हायस्कूल येथिल शाळेकरी मुलांनी श्रमदान च्या कामात सहभाग घेतला होता.यामध्ये सरपंच रामेश्वर चिमोटे, सचिव सुधीर भागवत साहेब, ग्रामपंचायत सदस्य विजय मावस्कर, बाबुलाल दारसिंबे,रेखा जामकर,कलावती मावस्कर,भारती माडवे,कदम साहेब, उमा घोम मॅडम, काळमेघ सर,बेठे सर, प्रविण येउल हे असुन गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
