बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
चिखली नगर परिषदेवर शहर विकासाला प्राधान्य देणार्या भाजपची सत्ता पुन्हा येणार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे लढू इच्छिणाऱ्या नगरसेवक व नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेतल्या. या बैठकीत इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्याचा व आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीचा संपूर्ण आढावा सादर केला. त्यावर सर्वंकष विचार करून उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.गेल्या अनेक वर्षांपासून शहराचा जो विकास खुंटला होता तो विकास आपण केला आहे. दीन, दलित, शोषित, पीडित, व्यापारी, शहरातील छोटे मोठे व्यावसायिक अशा घटकांचा विकास करून चिखलीचा कायापालट केला आहे. रस्ते, नाल्या, पाणी पुरवठा योजना, सभागृह, प्रत्येक समाजासाठी सामाजिक भवन, लहान मुलांना खेळासाठी गार्डन, प्रत्येक प्रभागातील समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शहरात अत्याधुनिक सांस्कृतिक भवन, प्रशासकीय इमारत, आधुनिक रेस्ट हाऊस, शहरातील कानाकोपऱ्याचा विकास केला. राहिलेला विकासही आपल्याला जोमाने करायचा आहे. त्यासाठी पुन्हा एकदा चिखली नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे, असा निर्धार या वेळी केला.या बैठकीत शहराच्या विकास आराखड्यावर, नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या उपायांवर आणि संघटनाच्या मजबुतीवर सखोल चर्चा झाली.इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्याचा अनुभव, समाजातील सहभाग आणि भविष्यातील विकासाचे नियोजन पक्षनेतृत्वासमोर मांडले. नागरिकाभिमुख आणि पारदर्शक नेतृत्व पुढे यावे, या हेतूने मुलाखतींमधून विधायक संवाद झाला.संघटनशक्ती, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि विकासाची वचनबद्धता यांच्या जोरावर चिखली नगर परिषद निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.या बैठकीस जिल्हा निवडणूक प्रभारी तथा राज्याचे कामगार मंत्री मा. ना. ॲड. श्री. आकाशजी फुंडकर, भाजपा बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री. विजयराजजी शिंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
