जळगाव जामोद प्रतिनिधी-
क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ अंतर्गत बुलडाणा येथे झालेल्या जिल्हास्तरीय रस्सीखेच (वय १७ मुली) स्पर्धेत जनता विद्यालय, जामोद येथील विद्यार्थिनींनी आपली ताकद, एकजूट आणि जिद्द सिद्ध करत विजेतेपदावर नाव कोरले.अंतिम सामन्यात जनता विद्यालय, जामोद विरुद्ध आदर्श विद्यालय, चिखली असा थरारक सामना रंगला. दोन्ही संघांनी कडवी झुंज दिली, मात्र शेवटच्या क्षणी दाखवलेल्या अदम्य आत्मविश्वास, लक्ष्यभान आणि संघभावनेच्या जोरावर जनता विद्यालयाच्या मुलींनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत विजयी महारथ साधली.या उल्लेखनीय विजयामुळे संघातील सर्व विद्यार्थिनींची आता विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून, शाळेचा गौरव द्विगुणित झाला आहे.या यशाबद्दल बोलताना मुख्याध्यापक आर. बी. राजपूत सर म्हणाले, “विद्यार्थिनींनी दाखवलेली जिद्द व शिस्त ही शाळेसाठी अभिमानाची बाब आहे.”यशस्वी संघातील सर्व खेळाडूंनी आपले यश मुख्याध्यापक राजपूत सर, पर्यवेक्षक अभिजित कुलकर्णी, क्रीडा शिक्षिका स्मिता डिडोळकर मॅडम आणि क्रीडा शिक्षक प्रतीक राऊत सर यांना समर्पित केले. विभागीय स्तरावरही अजिंक्यपद पटकवण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.या विजयामुळे शाळेत तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
