राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
एखाद्या शासकीय कार्यक्रमाला घराघरांतील आबालवृद्ध पहाटे ५ वाजता उठावे, घरापुढे सडासंमार्जन करून रांगोळी टाकावी आणि अख्ख्या गावाची स्वच्छता करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवावा असा हा अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील मोथा ग्रामपंचायत गावातील येथील प्रसंग सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.ग्रामपंचायत मोथा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मोथा ग्रामपंचायतीत दि.७/११/२०२५ते १४/११/२०२५ या कालावधीमध्ये एका आठवड्यात एक किलोमीटर शेत रस्ता बनविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शासकीय निधी वापरण्यात आला नसुन या रस्त्यावर गावातील नागरिकांनी लोकसहभागातुन शेत रस्ता करण्यात आला आहे.तसेच सरपंच सौ . विमला ताई धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान व लोकसहभागातुन अनेक कामे केली आहे. ग्रामपंचायत व प्रशासनाला गावकऱ्यांची जोड असली की, विकास होतो. त्याचा प्रत्यय मोथा ग्रामपंचायती मध्ये आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत आला.यामध्ये सरपंच विमला ताई धांडे, उपसरपंच साधुरामजी पाटील, ग्रामपंचायत अधिकारी कु.मनिषा सिरसाट, ग्रामपंचायत सदस्य गजानन शनवारे , तसेच राम भाकरे ,दिलीप चावंडे , रमेश खडके,सोनु निखाडे, सुनिल चव्हाण,तेजुराम शेळके,पवन पाटील, अक्षय पाटील, तसेच गावातील इतर नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून या कामात हातभार लावला असल्याचे दिसुन आले आहे.
