जळगाव जा. नगर परिषद निवडणूक मनसे शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज...


 जळगाव जा. नगर परिषद निवडणूक मनसे शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता मतदारांची नव्या चेहऱ्याला पसंती असल्याचे वास्तव्य अनुभवयास येत असून हाेवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी प्रभाग क्र.4 मधून नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.प्रभाग क्र. 4 मधील सर्व सामान्य आणि गोरगरीबांच्या अळी अडचणी सोडविण्याकरीता तत्पर असलेले नागेश भटकर यांनी यावेळी नगरसेवक पदाची निवडणुक लढवून या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करावे अशी मागणी त्यांच्या हितचिंतकांकडून होत आहे.मागील निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये शिवसेनेचे रमेश ताडे यांनी शिवसेनेचा झेंडा कायम ठेवला होता. तर या प्रभागामधून काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. तरी यावेळी काँग्रेस- शिवसेना - भाजपा असे लढतीचे चित्र असतांना यावेळी प्रभाग क्र.4 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागेश भटकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.या प्रभागाची सामाजिक व राजकीय समिकरणे पाहता मागील 9 ते 10 वर्षापासून या  प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी  नागेश भटकर हे नहमीच अग्रेसर भुमिका घेतात. नागरी समस्या सोडविण्याकरीता त्यांचे वतीने अनेक आंदोलने  करण्यात येवून नागरी समस्याचे निराकरण हे सुध्दा करण्यात आले असल्याने यावेळी प्रभाग क्र. 4 मध्ये मनसेचे इंजन धावणार असल्याचे चित्र आहे.विविध धार्मिक कार्यक्रम आणि  विविध समाज घटकांशी बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य एकनिष्ठतेने करणारे युवा नेते नागेश भटकर यांच्या नावाला पसंती मिळाली असून या होवू घातललेल्या नगर पालिका निवडणुकीची जय्यत तयारी त्यांनी सुरु केली आहे. त्यामुळे आता होणाऱ्या निवडणुकीत ते विजयाच्या वाटेवर वाटचाल करतील असा आशीर्वाद आता जनसमान्यातुन चर्चेचा ठरत आहे हे विशेष.

Previous Post Next Post