जळगाव जामोद शहराच्या होत असलेल्या निरंतर विकासासाठी पुन्हा भाजपा...!


 जळगाव जामोद शहराच्या होत असलेल्या निरंतर विकासासाठी पुन्हा भाजपा...!

जळगाव जामोद प्रतिनिधी...

नगर परिषदमध्ये शांतता, सर्वसामान्य जनतेची कामे आणि सन्मान हेच भाजपचे वचन!!जळगाव जामोद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज नगराध्यक्ष पदासह 10 प्रभागांतील एकूण 21 उमेदवारांनी अतिशय उत्साहात आपले नामांकन अर्ज दाखल केले.ही उपस्थिती म्हणजे पक्षाची एकसंधता, संघटनशक्ती आणि जळगाव जामोदच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या दृढ कटिबद्धतेचे ज्वलंत उदाहरण!अर्ज दाखल केल्यानंतर सर्व उमेदवारांनी माझ्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी भेट दिली. त्यांचे पारंपरिक औक्षण करून उत्साहाने स्वागत केले आणि प्रत्येक उमेदवाराचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

निवडणूक ही केवळ मतदानाची प्रक्रिया नसून शहराच्या भविष्याचा मार्ग आखण्याची मोठी संधी आहे. जळगाव जामोद नगर परिषदेच्या माध्यमातून विकासाची गती कायम ठेवत, शहराला पुढील पायरीवर नेण्याच्या ध्येयाने भाजपचे सर्व उमेदवार जनतेच्या विश्वासाने रिंगणात उतरले आहेत.जनतेच्या आशीर्वादातूनच ही विकासयात्रा अधिक सक्षमपणे पुढे जाणार असून, जळगाव जामोदचा सर्वांगीण आणि निरंतर विकास हे आमचे प्रमुख ध्येय राहणार आहे.नगर परिषदेतील शांतता, सर्वसामान्य जनतेची कामे आणि नागरिकांचा सन्मान — हीच भारतीय जनता पक्षाची अढळ भूमिका व विकासाची दिशा असणार आहे.जळगाव जामोद शहरातील सर्व आदरणीय मतदार बंधू भगिनींनी सर्व उमेदवारांना आपले आशीर्वाद द्यावेत हि नम्र विनंती.

Previous Post Next Post