आकाश निंबाळकर यांची आझाद समाज पक्षाच्या जळगाव जामोद विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती....


 आकाश निंबाळकर यांची आझाद समाज पक्षाच्या जळगाव जामोद विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती....

जळगाव जामोद प्रतिनिधी...

आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे यांच्या मार्गदर्शनात दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजी भीम आर्मी व आझाद समाज पार्टी चे संस्थापक अध्यक्ष खा.भाई चंद्रशेखर आझाद यांच्या विचाराने खंबीरपणे प्रेरित होऊन. जळगाव जामोद विधानसभा अध्यक्ष या पदी आकाश निंबाळकर यांना जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखडे यांच्या मार्फत नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण असताना. पक्षाची भूमिका पक्षाचे, वरिष्ठ पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून लवकरच कळवण्यात येईल. यावेळी, जिल्हाभर पक्ष बांधणी सुरू असतानी .जळगाव जामोद हा बुलढाणा जिल्ह्याचा शेवटचा तालुका असून. शेवटची विधानसभा आहे. अशावेळी जिल्हाभर मजबूतपणे पक्ष बांधणी ,संघटन बांधणी व्हावी. या उद्देशाने आजाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष व सर्व जिल्हा टीम तन-मन-धनाने प्रयत्नशील आहेत. आकाश निंबाळकर हे सुशिक्षित होतकरू व सामाजिक व्यक्तिमत्व आहेत.अशावेळी पक्ष बांधणी व येणाऱ्या निवडणूक काळामध्ये त्यांची पक्षाला अधिक प्रमाणात मदत होईल.

Previous Post Next Post