जळगाव जामोद प्रतिनिधी....
तालुका विज्ञान शिक्षक संघटना आणि पंचायत समिती जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी दिनांक 26 व 27 नोव्हेंबर रोजी सातपुडा कॉन्व्हेंट येथे उत्साहात संपन्न झाले दोन दिवशीय प्रदर्शनीमध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक गटातून 51 तर माध्यमिक गटातून 17 उपकरण विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केले.तसेच निबंध स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यामध्ये देखील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला. उदघाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सातपुडा कॉन्व्हेन्ट चे प्राचार्य बकाल सर, उदघाटक गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी साहेब, विस्तार अधिकारी व्यवहारे साहेब, जावरकर साहेब,विज्ञान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नरेंद वानखडे, सचिव राधेश्याम राठी यांचेसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते तर समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी संदिपकुमार मोरे साहेब यांच्या हस्ते क्रमांक मिळालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण भटकर, अस्मिता क्षीरसागर, निखिल राजवैद्य यांनी तर आभार प्रदर्शन विनोद खुपासे यांनी केले.
विजेत्याची यादी पुढील प्रमाणे...
--प्राथमिक गट--
प्रथम क्रमांक यथार्थ मनीष ढोले दिनी वीरा हायस्कूल जळगाव जामोद द्वितीय क्रमांक आर्या परमेश्वर बान्हेकर केशव माधव विद्यामंदिर जळगाव तृतीय क्रमांक वेदांती अनिल खुपासे सातपुडा कॉन्व्हेंट जळगाव...
--माध्यमिक गट--
प्रथम क्रमांक कृष्णाली बाळकृष्ण बघे पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव,
द्वितीय क्रमांक अथर्व सुनील इंगळे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ जळगाव जामोद
तृतीय क्रमांक यश प्रवीण बोदडे केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद.
सदर दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी जगदीश कीर्तने,रजनीकांत शेळके, विनोद खुपासे,निखिल राजवैद्य, सत्यजित बनसोड,विजय भारसाकळे, मनीष सारभुकन, यांनी परिश्रम घेतले.
