जळगाव जामोद प्रतिनिधी...
संकल्प अभ्यासिका पिंपळगाव काळे ला येथीलच सामाजिक कार्यकर्ते मंगेश मानकर यांनी ४७ हजार ७१७ रुपयांची नवी कोरी पुस्तके भेट स्वरूपात दिली आहे.दिनांक १ नोव्हेंबर रोजी माजी ग्रामपंचायत सदस्य तथा जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा पिंपळगाव काळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा उत्कृष्ट समाजसेवक मंगेश मानकर उर्फ लाला मानकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्याकडून संकल्प अभ्यासिका पिंपळगाव काळे यांना पुस्तके भेट दिली.पुस्तकांची एकूण किंमत ४७७१७ इतकी आहे. विद्यार्थ्यांसाठी पुस्तके अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण स्वरूपाची असतात पुस्तक वाचन ही विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारची त्यांची भूकच आहे म्हणून आपल्या वाढदिवसानिमित्त आपण एक आगळ वेगळं काही करावं असं त्यांनी ठरवलं आणि संकल्प अभ्यास केला पुस्तके भेट दिली. हे पाहून संकल्प अभ्यासिका मधील वाचकांनी मंगेश मानकर यांना भरभरून त्यांचे अभिनंदन केले. वाचकांना अपेक्षे पेक्षाही खूप काही भेटल्यामुळे त्यांच्यातील आनंद हा गगनात न मावण्यासारखा झाला.अगदी आनंदाचे वातावरण संकल्प अभ्यासिका मध्ये निर्माण झालं. त्यानंतर लगेचच संकल्प अभ्यासिके मधील संपूर्ण वाचकांनी मंगेश उर्फ लाला मानकर यांचा सत्कार देखील केला. सत्कार करतेवेळी मंगेश उर्फ लाला मानकर यांनी पुढच्या वाढदिवसानिमित्त अभ्यासिकेला एक लॅपटॉप देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
