आस्की किड्स च्या वेदांश अग्रवाल ची अहमदाबाद इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड...


 आस्की किड्स च्या वेदांश अग्रवाल ची अहमदाबाद इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड...

सैय्यद शैकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...

आस्की किड्स पब्लीक स्कूल येथे वर्ग १० वी मध्ये शिकणारा विद्यार्थी वेदांश बंकटलाल अग्रवाल याची इस्रो च्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या NSTS म्हणजेच नोबल सायन्स टॅलेंट सर्च ह्या परीक्षेत प्राविण्य मिळवत त्याने हे यश संपादन केले. सदर दौरा हा जानेवारी २०२६ मध्ये नियोजित आहे. ह्या दौऱ्यामध्ये त्याला  विक्रम साराभाई स्पेस सेंटर, रोबोटिक्स पार्क, नेचर पार्क, सायन्स सिटी, अर्थ ग्लोब प्लॅनेटोरियम, सरदार पटेल म्युझियम, साबरमती आश्रम, अक्वाटिक गॅलरी,आय आय टी इत्यादी येथे जाण्याची संधी सुद्धा प्राप्त होणार आहे. ह्या अभ्यास दौऱ्यामध्ये विविध अवकाशीय संकल्पना, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान, रोबोटिक प्रणाली, माहिती तंत्रज्ञान संबंधी तज्ञ लोकांचे मार्गदर्शन मिळवण्याची संधी प्राप्त होणार आहे.त्याचे हे यश शाळा प्रशासन तसेच त्याच्या कुटुंबासाठी गौरवांकित करणारी बाब म्हणून गणल्या जात आहे. तो आपल्या यशाचे श्रेय शाळा प्राचार्य नेहा झाडे मॅम, शिक्षक वृंद तसेच आपल्या आई वडिलांना देतो.

Previous Post Next Post