मेळघाटच्या वस्तापूर... येथे स्वच्छता दिंडी उत्साहात..अनोख्या पद्धतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान...


 मेळघाटच्या वस्तापूर... येथे स्वच्छता दिंडी उत्साहात..अनोख्या पद्धतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

एखाद्या शासकीय कार्यक्रमाला घराघरांतील आबालवृद्ध पहाटे ५ वाजता उठावे, घरापुढे सडासंमार्जन करून रांगोळी टाकावी आणि अख्ख्या गावाची स्वच्छता करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवावा असा हा अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील वस्तापूर गावातील येथील प्रसंग सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.गुरुवारी वस्तापूर येथे स्वच्छता दिंडी काढण्यात आली. प्रशासनाला गावकऱ्यांची जोड असली की, विकास होतो. त्याचा प्रत्यय वस्तापूर ग्रामपंचायतीमध्ये आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत आला टाळ-मृदंग, ढोलकीच्या थापावर अभंग भक्तीगीत गात अख्या गावाची स्वच्छता करून दिंडी काढली गेली.यामध्ये सरपंच केवल झामरकर, उपसरपंच गजानन येवले, सचिव सुधीर भागवत, सदस्य रामदास बेलसरे, झिंगृ झामरकर, लक्ष्मणजी येवले शालिकरामजी झामरकर, लालजी सावलकर, बिसरामजी बेलसरे, मणिरामजी बेलसरे, भीमरावजी येवले, गणपतजी येवले, महादेवजी येवले, गोंडूजी येवले, ज्ञानदेवजी येवले, महादेव शनवारे, मोतीरामजी काळे, नंदकिशोर येवले, केशवजी येवले, सचिन येवले अमोल शनवारे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post