सैयद शैकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट तालुक्यातील राष्ट्रीय अपंग विकास महासंघाची बैठक दि.४ नोव्हेंबर रोजी श्री गजानन महाराज सभागृह येथे राज्य उपाध्यक्ष प्रकाश अवचार, राज्य संचालक गणेश वाकोडे व विदर्भ अध्यक्ष तुळशीराम गुंजकर यांच्या उपस्थितीमध्ये दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्यावर चर्चा करण्यात आली व दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी अकोला जिल्हा उपाध्यक्ष गणेश सोनटक्के यांनी सर्व प्रथम गजानन महाराज यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी अकोट शहराध्यक्ष जब्बारशहा, शहराध्यक भास्कर गुहे, माजी तालुका अध्यक्ष सुनील बुंदले, रुखमा घुगे, मंगेश चव्हाण,छगन बंकूवाले,यांच्या हस्ते करण्यात आला या बैठकीला अकोट ताुक्यातीलतील तुळशीराम तांडे, शहीन शाह,मो. इमरान,आरिफ खान, पदाधिकारी व सदस्य यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांच्या सहकार्याने प्रत्येकाच्या अडचणी दूर करण्यासाठी पदाधिकारी सदस्य व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी तसेच तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.संजय गांधी निराधार विभागाचे तहसीलदार सुधीर थोटे यांनी दिव्यांगांना ऑनलाईन मोलाचे मार्गदर्शन केले तसेच पुरुषोत्तम चौखंडे यांनी दिव्यांगांना सभागृहा दिल्याने दिव्यांग कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
