हिवरखेड नगरपरिषद निवडणुक उपोषनकर्ते यांनी लढावी सामान्य जनतेची ईच्छा,अर्जुन खिरोडकार यांचे योगदान व्यर्थ नाही जाऊ देऊ जनता त्यांच्या पाठीशी...


 हिवरखेड नगरपरिषद निवडणुक उपोषनकर्ते यांनी लढावी सामान्य जनतेची ईच्छा,अर्जुन खिरोडकार यांचे योगदान व्यर्थ नाही जाऊ देऊ जनता त्यांच्या पाठीशी,,

हिवरखेड प्रतिनिधी...

,हिवरखेड येथे नगरपरिषद निवडणूक  येत्या पुढील महिन्यात होणार असून गावातील इच्छुक उमेदवारांना पक्षांनी तिकिटे वाटली,परंतु हिवरखेड नगरपरिषद होण्यासाठी ज्या व्यक्तीने खरा स्गर्ष केला आहे, त्याचीच या निवडणुकीत वेगळी भूमिका नसावी खिरोडकार यांनी सुद्धा निवडणूक लढावी अशी सामान्य जनता मागणी करीत आहे,निवडणूकला वेळ प्रसंगी लोक वर्गणीतून खर्च लावू, असे सुद्धा सामान्य नागरिक बोलत आहेत,खिरोडकार यांनी त्यांच्या पत्नीला नगराध्यक्ष करीता उमेदवारी पक्षांना मागावी व स्वतः नगरसेवकसाठी निवडून लढावी, पक्षांनी उमेदवारी नाही दिली तर स्वयंबळावर लढावे, खिरोडकार यांनी या अगोदर सुद्धा मोठा लढा नगरपरिषद साठी लढला कित्येक लढाऊ हिवरखेड नगरपरिषदसाठी त्यांच्या सोबत लढले,  त्यामुळे गावकऱ्यांची सहानुभूती त्यांच्या सोबत असल्याचे नागरिकाच्या बोलण्यावरून समजते नगरपरिषद होण्यासाठी काहींनी आपल्या स्वखर्चातून   आंदोलने केली, रक्ताने माखलेले पत्र मुख्यमंत्री  यांना पाठविले,   तर काहींनी स्वाक्षरी अभियान राबविले कडक उपोषणे केली,मूक आदोनले केली, मुंडण आंदोलने केली,  बहुतांश लढा लढविला कुठे विरोध झाला , कुठे यश आले, तरीही आपला लढा कायम ठेवला व शेवटच्या टोका पर्यंत पोहचले व हिवरखेड लढाऊ योद्धे गावकरी, तसेच पत्रकारांचे सहकार्य लाभले, या सर्वांच्या सहकाऱ्यांनी हिवरखेड नगरपरिषद अस्तित्वात आली,त्यामुळे नीती  जशी ज्याच्या कर्माचे फळ त्याला देते, असेच फळ जनता या लढाऊ योद्धाना देणार असे सामान्य जनतेच्या चर्चेत दिसून येत आहे,अर्जुन खिरोडकार यांनी नगरपरिषद होण्यासाठी मोठे आमरण उपोषन केले होते, तळगोळातून त्यांना जनतेनी पाठिंबा दिला होता, अर्जुन खिरोडकार यांनी प्रत्येक अडचणीचां सामना केला आम्ही तेव्हाही त्यांच्या सोबत होतो व आजही सोबत आहों,

प्रमोद निळे,

शिवसेना प्रमुख शिंदे गट हिवरखेड 


अर्जुन खिरोडकार यांच्या उपोषणाला प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचा पाठिंबा होता, व ते समाजाच्या कल्याना करिता छोटे मोठे नेहमी उपक्रम राबवितात,त्यांनी ही त्यांच्या या हक्काच्या नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक लढावी अशी आमची इच्छा,

शहजाद खान हिवरखेड

Previous Post Next Post