जळगाव जामोद प्रतिनिधी....
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 15/11/2025 रोजी लोकनायक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. प्रविण डाबरे , तर प्रमुख उपस्थिती सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा .राजीव देवकर तसेच प्रा. ऋषिकेश कांडलकर,प्रा गणेश जोशी होते. सुरूवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रविण डाबरे ,प्रा. राजीव देवकर, प्रा. ऋषिकेश कांडलकर, प्रा. गणेश जोशी, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन,तसेच लोकनायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन ,माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. राजीव देवकर यांनी अश्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्याना थोर व्यक्तिमत्वाच्या कार्याची माहिती होते, तसेच जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. वर्ग 12 ची विद्यार्थिनी कु. मयुरी गिरी, कु. कोमल नळकांडे यांनी जननायक बिरसा मुंडा यांचे जीवन कार्य, चळवळ, ब्रिटिशांविरुद्ध चा लढा, आदिवासींच्या हक्कासाठी चा संघर्ष या कार्याला उजाळा दिला. प्रा. गणेश जोशी यांनी आदिवासींचे जीवन आणि संघर्ष याची माहिती दिली, अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रविण डाबरे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन प्रा. रामेश्वर सायखेडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.विनोद बावस्कार, प्रा.नीलिमा भोपळे सर्व प्राध्यापक वृंद, समाधान निलजे,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला मोठया संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
