जळगाव जामोद प्रतिनिधी....
५ नोव्हेंबर २०२५: शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांच्या ५५६ व्या जयंतीनिमित्त (प्रकाश पर्व) शहरात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी हिम्मत सिंग चव्हाण आणि विजय राजपूत यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी गुरु नानक देवजींच्या सेवा आणि समतेच्या शिकवणीचे पालन करत एक स्तुत्य उपक्रम राबवला.जयंतीचे औचित्य साधून हिम्मत सिंग चव्हाण आणि विजय राजपूत यांच्या कार्यकर्त्यांनी आठवडी बाजार परिसरात गरजू लोकांना फळे वाटप केले.यावेळी बोलताना हिम्मत सिंग चव्हाण यांनी सांगितले की, "गुरुनानक देवजींनी 'नाम जपो, कीरत करो आणि वंड छको' (देवाचे नामस्मरण करा, प्रामाणिकपणे कमवा आणि गरजूंना वाटून खा) असा संदेश दिला. त्यांच्या या ५५६ व्या जयंतीनिमित्त, आम्ही हा छोटासा सेवाभाव जपण्याचा प्रयत्न केला आहे. गरजूंच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमच्यासाठी प्रकाश पर्वाचे खरे महत्त्व आहे."या उपक्रमासाठी विजय राजपूत यांनी देखील विशेष सहकार्य केले.या सामाजिक उपक्रमामुळे गुरुनानक जयंतीचा उत्साह अधिक वाढला आणि समाजात बंधुता व सेवाभावाचा संदेश पोहोचला.
