संग्रामपूर तालुका प्रतिनिधी....
आपण आपली भारतीय संस्कृती विसरत चाललो असून पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यात आपण धन्यता मनात आहोत शिवाय आजचा तरुणांनी व्यसनाधिनतेकडे न वळता राष्ट्र निर्माण कार्यात स्वतःला झोकून द्यावे आणि नवीन समाज निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन अँड अमोल भाऊ अंधारे यांनी केले.संग्रामपुर तालुका विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत अभियाना अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धेचे आयोजन १५ नोहेंबर रोजी करण्यात आले होते.या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते तरुणाईला मार्गदर्शन करतांना बोलत होते.येथील संत गुलाब बाबा विद्यालय व ज्युनियर कॉलेज च्या प्रांगणात आयोजीत या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य भाऊसाहेब थोटांगे तर विहीप जिल्हा मंत्री राजाभाऊ राजपूत,पो.उ.नि सोनवणे, डॉ. मनोज तायडे,डॉ,गोपाल सुरतकर डॉ.हरीभाऊ अंभोरे, गोपाल रहाटे, भारत बावस्कर गणेश वानखडे अविनाश बोपले,भीमाशंकर कातव, ,आदींची उपस्थिती होती.प्रथमतः भारत मातेच्या प्रतिमे समोर दीप प्रज्वलन करून हारार्पण करण्यात आले.तत्पूर्वी सकाळी ८ वाजता वरवट बकाल येथील जिनिग अँड प्रेसिग च्या आवारातून या धावण्याच्या स्पर्धेला सुरवात करण्यात आली. या स्पर्धे मध्ये तालुक्यातील जवळपास दोनशे युवकांनी आणि युवतींनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धे मध्ये यश रामराव पांडे प्रथम,माधव सुभान जामरा द्वितीय,गौरव गजानन मिसाळ तृतीय तर महिला गटात शीतल दशरथ हागे प्रथम,पूनम व विनायक झाडोकर द्वितीय या हे स्पर्धक विजयी झाले असून यांना माजी कामगार मंत्री आ.डॉ संजय कुटे यांच्या कडून रोख रक्कम व स्मृती चिन्ह आणि सर्व 200 स्पर्धकांना टी शर्ट देऊन गौरविण्यात आले.वयस्कर स्पर्धक म्हणून बंडू भाऊ चावरे यांचा विशेष सत्कार कारण्यात आला.यावेळी प्राचार्य भाऊसाहेब थोटांगे,संस्था सचिव गोपाल रहाटे,राजाभाऊ राजपूत आदींनी युवकांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन बावणे यांनी केले. क्रीडा शिक्षक सुधीर मानकर यांनी संचालन तर जिल्हा सह संयोजक भारत बावस्कर यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमासाठी विकी भटकर,अक्षय मसुरकर,अभिजीत शिरसोले,ऋषी कोकाटे,मंगेश वानखडे,ऋषी धामोळे,विक्रम उमरकर,विष्णू ठोंबरे,अक्षय मोहकर गणेश सपकाळ संग्राम शहर व तालुक्याच्या वतीने बजरंगीनी परिश्रम घेतले. पसायदाना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी परीसरातील युवकांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.
