नशा करा मेहनतीचा, बिमारी लागेल कामयाबीची", पोअ. निलेश तांबे निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा प्रशस्तिपत्र व स्मृतीचिन्ह देऊन केला सन्मान..


 नशा करा मेहनतीचा, बिमारी लागेल कामयाबीची", पोअ. निलेश तांबे निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा प्रशस्तिपत्र व स्मृतीचिन्ह देऊन केला सन्मान..

अनिल भगत/बुलढाणा...

 पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे संकल्पनेतून दि.२६ जुन पासून संपुर्ण बुलढाणा जिल्ह्यात अंमली पदार्थांविरुध्द "मिशन परिवर्तन" अभियान राबविण्यात येत आहे. दि.८ नोव्हेंबर रोजी पोलीस मुख्यालय बुलढाणा येथे जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मा. पोलीस अधीक्षक  निलेश तांबे यांचे प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी मिशन परिवर्तन अंतर्गत घेतलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा व तरुणांशी संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमासाठी अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक-बुलढाणा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांची विशेष उपस्थिती होती.या वेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे हस्ते पो.स्टे. लोणार- विद्यार्थी कु. राखी बद्री कुलाळ, संध्या गोविंद राठोड, वैष्णवी राजू गाभणे., पो.स्टे. धाड- नितीन विलास गावंडे, कु. वैष्णवी विनोद पिंपळे, कु. ऋतुजा ज्ञानेश्वर काळे, पो.स्टे. खामगांव कु. वैष्णवी संतोष हिवरकर, प्रविण गजानन जमदाळे, सुरज संतोष वानखडे, पो.स्टे. खामगांव ग्रा- कु. तेजल अभयसिंग बोराडे, कु. वैष्णवी ज्ञानेश्वर वारकरी, कु. पुनम तुकाराम इंगळे, कु. आरुषी श्रीकांत हावरे, किरण निलेश इंगळे, पो.स्टे. धामणगांव बढे- गौरव संतोष सरोदे, कु. अक्षरा दिलीप इंगळे, अथर्व सुनिल काकर, पो.स्टे. सिंदखेड राजा- कु. रोहिणी कुंडलीक जाधव, कु. आरती विजय चौधरी, पो.स्टे. साखरखेर्डा- ओम गजानन चव्हाण, कु. वैष्णवी बंडू मारके, कु. पूजा विष्णु थुट्टे, पो.स्टे. मलकापूर श.-कु. आरोहि शिवाजी पाटील, ओम श्रीकृष्ण टेकाळे, संस्कृती रायपूरे, पो.स्टे. मलकापूर ग्रा. कु. भाग्यश्री प्रमोद गावंडे, कु. प्रिया संतोष सुशिर, कु. गौरी निवृत्ती नारखेडे, कु. ऋतूजा अभिमन्यु म्हळसणे, पो.स्टे. चिखली - प्रसाद मदन ठेंग, कु. दिव्या शरद म्हळसणे, सार्थक संदिप बोरकर, कु. रजनी शिवहरी लहाने, पो.स्टे. अमडापूर- कु. संस्कृती प्रविण शामदे, कु. श्रेया राजेंद्र पद्मने, धनंजय रणविर गवई, आदित्य देवराव गवई, कु. भूमिका संतोष डांगे, कु. आरती विलास जायभाये, पो.स्टे. नांदूरा विवेक विजय हातळकर, कु. स्नेहल संतोष खामणकर, कु. वैष्णवी लक्ष्मण तायडे, पो.स्टे. संग्रामपूर कु. संचिता शिवदास गोल्हार, कु. अक्षरा संतोष काळे, कु. राबीका ईस्माईल तायडे, कु. प्रणाली रामेश्वर बेलुरकर, पो.स्टे. देऊळगांव राजा कु. स्वरा विशाल कंकाळ, कु. अंजली रामेश्वर वानखडे, कु. शिवानी संतोष शेरे, पो.स्टे. जानेफळ- कु. शिवाजी राजू मेहेत्रे, कु. गायत्री राजेश सुरुशे, गोपाल मंगल चव्हाण, कु. काजल ज्ञानेश्वर राठोड, पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण कु. पुनम दत्तात्रय रिंढे, कु. कृतीका गजानन जाधव, कु. पूनम राजू तायडे, कु. प्रेरणा समाधान झिने, पो.स्टे. बुलढाणा शहर- कु. पल्लवी देविदास खराटे, कु. तेजल प्रमोद गावंडे, कु. अक्षरा रतन कुंडेटकर, संदेश नितीन सरदार, जय राहूल गायकवाड, अभिजित अनिल घुसळकर, कु. रेवती संजय टेकाळे, यश संतोष इंगळे, मोहिम हिरालाल हिरेकर, कु. भारती विलास घोंगडे, कु. मानसी बुद्देश्वर इंगळे, कु. दुर्गा श्रीकृष्ण बडगे, कु. अंकीता चंद्रदास खरात, श्रेयस किरण जाधव, वल्लभ संतोष पाटील, अंश गजानन गवई, कु. सांची शिवनारायण गवई, कु. अनुष्का विजय पाटील, उदय योगेंद्र गुळवे, कु. मंजीरी रामकुमार जाधव, हिरल संतोष खिल्लारे या निबंध आणि चित्रकला स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.

निबंध व चित्रकलेमध्ये परिक्षणाची भूमिका निभावलेले परिक्षक पठाण सर, डॉ. गायत्री सावजी, डॉ. शिवशंकर गोरे, डॉ. शिवाजी देशमुख, किरण वाघमारे, अस्मीता खंडेराव, पूजा काकडे, संदिप राऊत, दिनेश कानडजे, सपना कानडजे, मनोज चव्हाण, ज्योती धंदर, डॉ. नितीन जाधव, प्रा. सुनिल कानडजे, वसंत धारे, सुभाष देशमुख यांचाही या प्रसंगी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोनि सुनिल अंबुलकर यांनी करुन, सदर कार्यक्रमाचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे प्रारंभी गवई यांचे पथकाने सायबर सुरक्षा आणि युवकांमधील अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी पथनाट्य सादर करुन उपस्थितांचे प्रबोधन केले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना सुरुवातीला व्यक्तीच्या आयुष्यात मेहनत सर्वात महत्वाची असून, आपण निवडलेल्या कोणत्याही क्षेत्रात मेहनत केल्यास नक्कीच यश प्राप्त होते असे सांगीतले. या वेळी जिल्ह्यातून निबंध व चित्रकला स्पर्धेमध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सहभागाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम तसेच विद्यार्थी जिवनात शिस्तीचे महत्व या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन, नशामुक्त समाजासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. अंमली पदार्थांचा विळखा तरुणांनी व विद्यार्थ्यांनी ओळखून त्या पासून वेळीच सावध व्हावे. असे व इतर महत्वपुर्ण बाबी उपस्थितांना मार्गदर्शीत केल्या. या प्रसंगी अपोअ. अमोल गायकवाड यांनी मिशन परिवर्तन अंतर्गत जिल्हा पोलीस दलाचे राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष  रणजितसिंग राजपूत यांनी निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून मिळालेल्या भरघोस प्रतिसादा बद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

पोलीस दल व पत्रकार संघ मिळून चांगले उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षक वृंद, पत्रकार, पोलीस अधिकारी, अंमलदार यांना अंमली पदार्थ विरोधी नशामुक्तीची शपथ दिली.कार्यक्रमाला पोनि. सुनिल अंबुलकर स्थागुशा. बुलढाणा, पोनि. रवि राठोड पो.स्टे. बुलढाणा शहर, पोनि. बाळकृष्ण पावरा (प्र. पोलीस उपअधीक्षक गृह), पोनि. गजानन कांबळे पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण, सपोनि. दिपक ढोमणे वाचक पोअ., पत्रकार बांधव सर्वश्री. राजेश डिडोळकर, सुधाकर अहेर, कासिम शेख, वसीम शेख, रविंद्र गणेशे, शिवाजीराव मामलकर, ब्रम्हानंद जाधव, प्रेमकुमार राठोड, सुधाकर मानवतकर, पवन सोनारे, राम हिंगे, मॉ. जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे, अॅङ रमेश भागिले, भूषण पंजाबी यांचेसह जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वृंद हजर होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन डॉ. गायत्री सावजी तर आभार प्रदर्शन जिल्हा पत्रकार संघाच्या महिला सेलच्या जिल्हाध्यक्षा मृणाल सावळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोनि. सुनिल अंबुलकर स्थागुशा बुलढाणा, पोनि, बाळकृष्ण पावरा प्र. पोलीस उपअधीक्षक (गृह), सपोनि. दिपक ढोमणे वाचक पोअ., RSI गणेश जावळे, पोउपनि, प्रताप बाजड, सफौ. नसीम मिर्झा व पोलीस स्टाफ स्थागुशा तसेच पोलीस मुख्यालय बुलढाणा यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post Next Post