जळगाव (जामोद) प्रतिनिधी...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद चंद्र पवार) गटाच्या जिल्हा अध्यक्षपदी बाजार समितीचे सभापती तथा पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांची दिनांक ५ नोव्हेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.ऍड.शशिकांत शिंदे यांनी प्रफेनजीत पाटील यांना नियुक्ती पत्र दिले. मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये नियुक्तीपत्र देतेवेळी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आ. विद्याताई चव्हाण, रोहिणीताई खडसे, रवींद्र पवार यांच्यासह राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.आपल्या नियुक्तीचे श्रेय त्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, आ. रोहित पवार, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना दिले आहे.प्रसेनजीत पाटील यांची नियुक्ती होताच जळगाव जामोद येथे तहसील चौकामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गोळा होत फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला, यावेळी विश्वासराव भालेराव, प्रमोद सपकाळ, ईरफान खान, विठ्ठल वाघ, महादेव भालतडक,सिद्धार्थ हेलोड़े, सुभाष कोकाटे, मनोहर वाघ, शेख जावेद,संजय ढगे, सुभाष पाटिल, adv. करीम खान, adv. मोहसिन खान, एजाज देशमुख, कैलास मानकर, गुणवंतराव वाघ, विष्णु रोठे, तुकाराम वाघ, राम पारस्कार, आशिष वायझोडे,दत्ता डिवरे, सुपड़ा ताकोते, एस.टी. जाधव, नीलेश ढगे, संतोष देशमुख, आकाश जाने, अंबादास सारोकार, रमेश वायझोडे, योगेश कुवर,सतीश तायडे,विशाल वाघ, अक्षय कुनगाड़े, योगेश भीसे, आनंद तायडे,जय कागदे, धनंजय सारोकार,शेख जाकिर,अतुल मानकर,अक्षय कोकाटे,राहुल मानकर, एम.डी. रेहान, अतीक भाई, अंकित हेलोड़े यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
