आर सी २४ न्युज नेटवर्क बुलढाणा....
बुलढाण्यामध्ये एक शाम खाटू वाले के नाम श्री श्याम संकीर्तन सोहळ्याचे आज 13 डिसेंबरला सायंकाळी चार वाजता बुलढाण्यातील गर्दे वाचनालय सभागृह याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. श्री शाम परिवार बुलढाणा तर्फे आयोजित एक शाम खाटू वाले के नाम कार्यक्रमात दिल्ली येथील सुप्रसिद्ध गायक अंश आणि वंश तर हरियाणा येथील परविंदर पलक, अमरावती येथील अमोल तीवलकर यांच्या बहारदार संकीर्तन सोहळ्याचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करण्यात आले आहे.
हारे का सहारा खाटू श्याम हमारा म्हणून जगभरात सुप्रसिद्ध असलेले खाटू श्याम बाबा यांची आख्यायिका महाभारतातील कथेतील आहे.श्रीकृष्ण कृपाशीर्वादातून घटोत्कचपुत्र बरबरीक यांच्या त्याग आणि समर्पणाचे प्रतीक म्हणून श्रीकृष्ण भगवंताने त्यांना श्याम नाम देऊन राजस्थान मधील खाटू निवासी क्षेत्रात कलियुगातील हरलेल्या भक्तांचा सहारा होण्याचा कृपाशीर्वाद देण्याची कथा महाभारत आणि हिंदू धर्मातील धर्मग्रंथांमध्ये सर्वशुत आहे. खाटू श्यामधाम येथे दैनंदिन दहा ते पंधरा लाखांचा भक्तांचा ओघ पाहता बुलढाण्यातील भक्तांना श्री श्याम खाटू भगवंताचे दर्शन व्हावे. त्यांची अनुभूती व्हावी या उदांत भावनेतून श्री श्याम परिवार बुलढाण्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला श्री श्याम भाविक भक्तांनी बहुसंख्येने सामील व्हावे असे आवाहन श्री श्याम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाची संपूर्ण तयारी पूर्णत्वास गेली असून उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक असलेले सर्व प्रमुख पाहुणे बुलढाणा नगरीत येणार आहेत. अशी माहिती श्री शाम परिवाराच्या वतीने देण्यात आली.
