सुनगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पालक सभा संपन्न...


 सुनगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पालक सभा संपन्न...

जळगाव जामोद दि.१३

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा येथे दिनांक १० डिसेंबर रोजी महत्त्वपूर्ण अशी पालक सभा बोलाविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर धुळे यांचेसह सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत, सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई भगत, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुंडकर मॅडम, डॉक्टर शुक्ला, उर्दू शाळा मुख्याध्यापक मजहर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. 

           या पालक सभेमध्ये निपुण भारत अभियान २०२६- २७ ची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना नियमित शाळेमध्ये उपस्थित ठेवणे, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत पालकांचा महत्वपूर्ण सहभाग, किशोरवयीन मुलींच्या समस्या उपाय व विविध मार्गदर्शन, माता पालकांचा निपुण भारत अभियानात महत्त्वपूर्ण सहभाग इत्यादी विषयांवर ही पालक सभा संपन्न झाली..

    पालक सभेचे सूत्रसंचलन शाळेचे शिक्षक बेग यांनी केले. प्रास्ताविक खेरोडकार सर यांनी तर आभारप्रदर्शन कसुरकार सर यांनी मानले. पालक सभेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक प्रदीप वाकेकर, राऊत सर, धर्मे मॅडम, शेख सर, गवई मॅडम, शालेय पोषण कर्मचारी मनोहर वानखडे यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post Next Post