बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा पत्रकारावर जीवघेणा हल्ला...!


 बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा पत्रकारावर जीवघेणा हल्ला...!

आर सी २४ न्युज नेटवर्क...

सावळी फाट्यावर दिनांक २२ नोव्हेंबर रोजी पत्रकार अमर रघुनाथ तायडे यांना त्यांच्या ओळखीतील नरेश वसंतराव हाटोळे या इसमाने थेट फोर-व्हिलर आडवी लावून रस्त्यात अडवले, हातात लोखंडी रॉड घेऊन जीव घेण्यासाठी धाव घेतली आणि जातीय शिवीगाळ करीत अपमान केला. दिवाळीच्या जाहिरातीसाठी दिलेले दोन हजार रुपये जबरदस्तीने स्वीकारा आणि जाहिरात लागली नाही म्हणून पत्रकाराला मध्यरात्री रस्त्यात अडवून अमर तायडे यांना अत्यंत गलिच्छ जातीय शिवीगाळ केल्याचं तक्रारीत नमूद आहे, “आता लगेच दोन हजार दे नाहीतर तुझ्या गाडीची चाबी काढून घेतो..तुला आत्ता इथंच संपवतो” अशा सरळसरळ जीवघेण्या धमक्यांचा वर्षाव झाला. पत्रकार तायडे यांनी शांतपणे परिस्थिती समजावण्याचा प्रयत्न केला, तरी आरोपीचा राग बेकाबू झाला आणि लोखंडी रॉडने मारण्यासाठी धाव घेतली. याच क्षणी भेंडवळहून पातूरकडे  रवि पाटील आणि शंकरराव तेथे थांबले आणि त्यांनी पत्रकार अमर तायडे यांना वाचविले. तरीही या दोघांच्या उपस्थितीतदेखील हाटोळे यांनी पुन्हा जातीय शिवीगाळ करत धमक्या देत गाडीत बसून पळ काढला.या संपूर्ण हल्ल्या संबंधित तामगाव पोलीस स्टेशनमध्ये FIR क्रमांक 412/25 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 मधील सर्वात कठोर कलमे, धारा 126(2) हल्ल्याचा प्रयत्न, धारा 130 जीवघेणी धमकी, धारा 351(3) शारीरिक इजाचा प्रयत्न, धारा 352 जबरदस्ती  तर SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार 3(1)(r) जातीय शिवीगाळ, 3(1)(s) अपमान, आणि 3(2)(va) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची सूत्रे मलकापूर उपविभागाचे एसडीपीओ आनंद महाजन यांच्याकडे आहेत.

Previous Post Next Post