अकोटमध्ये प्रतिबंधीत गुटख्याची वाहतुक करणारा आरोपी शहर पोलीसांच्या अटकेत...


 अकोटमध्ये प्रतिबंधीत गुटख्याची वाहतुक करणारा आरोपी शहर पोलीसांच्या अटकेत...

सय्यद शकिल/अकोट...

 शहर पोलीस स्टेशनचे पोउपनि निलेश बारहाते तसेच पोलीस स्टाफ पोहवा गणेश सोळंके,नापोकों विपुल सोळंके, पोकों मोहन दुर्गे ब नं १५४ पोकॉ अश्विन चौव्हाण,पोकों कपिल राठोड पोकों नितेश जयराम सोळंके,पोकॉ सुबोध सुधाकर खंडारे हे शहर पोलिस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करित असतांना संध्याकाळी ०७/०० वा चे दरम्यान त्यांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की एक मोटरसायकल चालक त्याचे हिरो डिलक्स मो सा क्रमांक एम.एच.३० बि.जे ९७४६ वर बॉम्बे सलुन समोरून नवगाझी प्लॉट कडे शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा घेवुन जाणार आहे.अशा गोपनीय  माहीतीवरून दोन पंचांना सोबत घेवुन बॉम्बे सलुनसमोर नाकाबंदी केली असता काही वेळातच एक इसम मोटरसायकलवर पांढ-या रंगाच्या दोन थैल्या घेवुन येतांना दिसला वरून सदर इसमाचा संशय आल्याने त्यास थांबवुन त्याचे मोटरसायकलवरील थैल्यांची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला (१) बाहुबली पान मसाला गुटख्याचे प्रत्येकी २४०/- रू किमतीचे १९६ पॉकीट किंमत ४७,०४०/- रू (२) केसर युक्त विमल पान मसाला गुटख्याचे प्रत्येकी १९८/- रू किमतीचे २७ पॉकीट किंमत ५,३४६/- रू(३) व्हि वन तंबाखु चे प्रत्येकी ३३/- रू किमतीचे २७ पॉकीट किमंत ८९१/- रू व एक हिरो डिलक्स मो सा कमांक एम.एच.३० बि.जे ९७४६ किमंत ७०,०००/- रू असा एकुण १२३,२८४/- रू पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतला.आरोपी नामे शफिक शा बशीर शा वय ३८ वर्षे रा.नवगाझी प्लॉट अकोट याचेविरुध्द कलम १२३,२२३,२७४, २७५ भारतीय व्याय संहिता सहकलम २६ (i), (iv), २७ (३) (d) (e) (२) (a) अन्न सुरक्षा आणी मानके अधिनियम २००६ सह मा अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध सुरक्षा प्रशासन महाराष्ट्र राज्या यांची अधिसुचना कमांक असुमा अ अधि सुचना -३६९/७ दि.१५/०७/२०२० चे उल्लंघन अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.ही कारवाई मा. जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक,मा.अप्पर पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.अमोल माळवे,पोउपनि निलेश बारहाते, पोहेका गणेश सोळंके, नापोकों विपुल सोळंके, पोकों मोहन दुर्गे, पोकॉ अश्विन चौव्हाण,कपिल राठोड, नितेश सोळंके, सुबोध खंडारे यांनी केली.

Previous Post Next Post