आडनदीजवळ मिनी ट्रॅव्हल्सचा अपघात..आडनदी जवळ उतारात मिनी ट्रॅव्हल्स सरकली..चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला जखमी...


 आडनदीजवळ मिनी ट्रॅव्हल्सचा अपघात..आडनदी जवळ उतारात मिनी ट्रॅव्हल्स सरकली..चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला जखमी...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती जिल्हा चिखलदरा तालुका 14 डिसेंबर 2025 रोजी दुपारी अंदाजे 3.30 वाजताच्या सुमारास मिनी ट्रॅव्हल्स (क्र. DD 03 T 9048) ही 22 महिला पर्यटकांना घेऊन चिखलदरा येथून चंद्रपूरकडे जात असताना ग्राम आडनदीजवळ उताऱ्यावर थांबली होती. यावेळी ट्रॅव्हल्समधील 17 ते 18 महिला प्रवासी व चालक खाली उतरले असता वाहन अचानक उताराच्या दिशेने पुढे सरकू लागले.वाहन थांबवण्याच्या प्रयत्नात चालक सुमित बनकर (वय 35, रा. चंद्रपूर) ट्रॅव्हल्ससमोर गेला असता वाहन त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत ट्रॅव्हल्समधील वैशाली चहांदे, वैशाली दुधगवळी, मधू पांडे व जयश्री उंदीरवाले (सर्व रा. चंद्रपूर) या चार महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.मृत चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर येथे पाठविण्यात आला आहे. उर्वरित 22 महिला प्रवाशांची चंद्रपूरकडे जाण्यासाठी दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करून त्यांना सुरक्षितपणे रवाना करण्यात आले आहे. सदर महिला प्रवासी चंद्रपूर येथून चिखलदरा येथे पर्यटनासाठी आलेल्या होत्या व परतीच्या प्रवासात हा दुर्दैवी अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या परिसरात शांतता असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post Next Post