अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीत २८ बॉक्स देशी दारू सह ४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...स्था.गु.शाखेची कारवाई...


 अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीत २८ बॉक्स देशी दारू सह ४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...स्था.गु.शाखेची कारवाई...

बुलढाणा दि.१५:

जिल्ह्यात अवैध देशी, विदेशी व हा.भ. दारु बाळगून चोरटी वाहतूक व विक्री करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून, त्यांचेवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पो. स्टाफची स्वतंत्र पथके तयार करुन त्यांना वरिष्ठांचे सुचनांप्रमाणे कार्यवाही करणेबाबत सुचित केले होते.

सदर अनुषंगाने, दि. 14/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, काही ईसम हे त्याचे ताब्यातील वाहनामध्ये देशी दारुचे बॉक्स बाळगून त्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने अमडापूर वरुन ग्राम मंगरुळ नवघरे चौफुल्लीकडे येत आहे. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ग्राम मंगरुळ नवघरे चौफ्फुल्ली येथे नाकाबंदी केली असता आरोपी नामे (1) सुरेश जगन्नाथ सवडतकर वय 42 वर्षे रा. अमडापूर ता. चिखली., (2) शुभम विजय भालेराव वय 25 वर्षे रा. अमडापूर हे त्यांचे ताब्यातील चारचाकी वाहनामध्ये देशीदारुची चोरटी वाहतूक करतांना मिळून आले. आरोपी यांचे ताब्यातून (1) देशी दारुचे 28 बॉक्स किं. 1,08,640/-रु., (2) मारुती सुझुकी कंपनीची एस प्रेसो पांढऱ्या रंगाची कार किं. 3,00,000/-रु. असा एकूण 4,08,640/-रु.चा मुद्देमाल हस्तगत केला. पकडलेल्या दोन्ही आरोपी विरुध्द पो.स्टे. अमडापूर येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स्टे. अमडापूर करीत आहेत.सदरची कारवाई निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेश,श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक खामगांव, अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे नेतृत्वात पोउपनि. अविनाश जायभाये, पोना, अनंता फरताळे, सुनिल मिसाळ, पोकॉ. अमोल शेजोळ, गणेश वाघ, सतीश नाटेकर, मपोकॉ.पूजा जाधव नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांचे पथकाने केली.

Previous Post Next Post