नगरपरिषदेची दिशाभूल करून मृत्यू प्रमाणपत्र मिळविले.वृद्ध महिलेच्या बँक खात्यातून मुलांने केले तब्बल १० लाख लंपास...


 नगरपरिषदेची दिशाभूल करून मृत्यू प्रमाणपत्र मिळविले.वृद्ध महिलेच्या बँक खात्यातून मुलांने केले तब्बल १० लाख लंपास...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

मुलानेच वृद्ध आईचा मृत्यू झाल्याचे स्वयंघोषित घोषणापत्र तयार करून आईच्या मृत्यूची नोंद नगरपरिषद कार्यालयात करून मृत्यू प्रमाणपत्र मिळविले व उतार वयात वृद्धेने आपल्या उर्वरित जीवन व्यापनासाठी बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवलेली दहा लाख रुपयांची रक्कम मुलाने वृद्धेच्या बँक खात्यातून लंपास करून वृध्द आईला भीक मागून खाण्यास लाचार केल्याची धक्कादायक घटना जळगाव जामोद शहरात समोर आली आहे.प्रेमसिंह कमलसिंह राजपूत या व्यक्तीने आपली आई पाच ऑक्टोबर २०२३ रोजी मृत्यू पावल्याचं स्वयंघोषणापत्र २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जळगाव जामोद नगर परिषदेत देऊन आईच्या मृत्यूची नोंद केली.जळगाव जामोद नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी कुठलीही शहानिशा न करता जिवंत वृद्धेच्या मृत्यूची नोंद करून तसं प्रमाणपत्र ही या मुलाला देऊन टाकलं...  

प्रेमसिंह राजपूत याने आपल्या आईच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राच्या आधारे आईच्या खात्यात ठेव म्हणून जमा असलेले दहा लाख रुपये बँकेतून काढून पसार झाला.ही बाब ज्यावेळी जिवंत असलेल्या आई  कौशल्याबाई राजपूत यांना माहिती पडली तेव्हा त्यांनी नगरपरिषदेत स्वतःच्याच मृत्यूचे प्रमाणपत्रासाठी स्वतःच्या नावाने अर्ज केला व विशेष म्हणजे नगर परिषदेने हे प्रमाणपत्र ही कौशल्य बाईंना जिवंत असताना मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकलं...! 

७५ वर्षीय कौशल्याबाई यांनी बँकेत चौकशी केली असता बँकेतील दहा लाख रुपये ही त्यांचा मुलगा प्रेमसिंह याने काढून पसार झाल्याची माहिती मिळाली.त्यावेळी कौशल्याबाईंच्या पायाखालची जमीन सरकली.कौशल्याबाई या आता एकट्याच एकाकी जीवन जगत असून मी जिवंत आहे असं त्यांना आपल्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेऊन पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागत आहेत.दोन महिन्यापूर्वी तक्रार देऊनही अद्याप पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याचा आरोप कौशल्याबाईंनी केला आहे.स्वतःच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जळगाव जामोद नगर परिषदेकडे जिवंतपणी मागण्याची वेळ  वृद्ध कौशल्याबाईंवर आली.या संपूर्ण प्रकरणामुळे आता स्वतःचं घर विकून बँकेत दहा लाख रुपये ठेवलेल्या कौशल्याबाई या एकाकी जीवन जगत असून त्यांना कुणाचाही सहारा उरलेला नाही.मात्र या सगळ्या प्रकारामुळे कौशल्या बाईच्या या अवस्थेला नेमके जबाबदार कोण?सोबतच मृत्यूच दिलेल प्रमाणपत्र देखील रद्द करण्यात आले आहे.७५ वर्षीय वृध्देने दिनांक ९ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध देखील आता गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे.. तसेच वृद्धेच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी बनावट व खोटं स्वयंघोषणापत्र तयार करून नगरपरिषद कार्यालयात देऊन नगरपरिषदेची फसवणूक केली याप्रकरणी सुद्धा उशिरा का होईना मुख्याधिकारी सुरज जाधव यांनी वृद्धेचा मुलगा प्रेमसिंग कमलसिंग राजपूत याचे विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार देऊन अप क्र.६०५/२०२५ कलम ४२०,४६८,४७१ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.

Previous Post Next Post