मेळघाटातील आदिवासींची संसदवारी; प्रियांका गांधींशी दिल्लीत संवाद..बळवंत वानखडे यांची संकल्पना : मेळघाटात येण्याची दिली ग्वाही...


मेळघाटातील आदिवासींची संसदवारी; प्रियांका गांधींशी दिल्लीत संवाद..बळवंत वानखडे यांची संकल्पना : मेळघाटात येण्याची दिली ग्वाही...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

'आप कैसे हो? आपकी समस्या क्या है? आपको यहा पर आकर कैसा लगा? मै जरूर आऊंगी मेलघाट में' असे म्हणत काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी मेळघाटातून दिल्ली येथे खासदार बळवंत वानखडे यांच्यासमवेत संसद भवनात आलेल्या आदिवासींसोबत संवाद साधला. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्यानंतर आता प्रियांका गांधी मेळघाटात येणार आहेत. राहुल गांधी यांनी परतवाडा येथे मेळघाटच्या पायथ्याशी सभा घेतल्याच्या स्मृतीला यावेळी उजाळा दिला...ज्यांनी आजवर आपल्या गावची वेस कधी ओलांडली नाही, अशा दीडशेवर आदिवासी बांधवांनी दिल्लीतील देशाची संसद आणि परिसर पाहिला, नेत्यांचे जवळून अवलोकन केले, त्यांच्याशी संवाद साधला. खा. वानखडे यांच्या अभिनव संकल्पनेतून आदिवासींचे 'संसद दर्शन' घडले. माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात दयाराम काळे, सहदेव बेलकर, धारणी कृषिउत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल येवले, मेहपतसिंग उईके, संजय बेलकर, राजेश सेमलकर, पीयूष मालवीय नानकराम ठाकरे,बलाराम जांम्बु,सोहन कासट ,तुळसिराम दहीकर,गानु सावलकर,उमेश जांबे, ललित नैकले,कुष्णा राजणे,आदी मेळघाटातील पदाधिकाऱ्यांनीही दिल्ली गाठली.

____________________________

गांधींनी ऐकल्या मेळघाटातील समस्या..

काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रियांका गांधी, संघटन सचिव खा. के. सी. वेणुगोपाल यांच्याशी खा. बळवंत वानखडे यांनी भेट घडवून आणली. यावेळी आदिवासी बांधवांनी कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, वीज, पाणी, रस्ता आरोग्य शिक्षण नेटवर्क या मूलभूत सुविधांचा पाढा त्यांच्यापुढे मांडला. मेळघाटात आपण येणार असल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले.

____________________________

आजी, आई आणि मुलगी

माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी कोलकास येथे भेट दिली होती. त्यानंतर सोनिया गांधी यांची सभा धारणी तालुक्यातील दुनी येथे झाली, तर राहुल गांधी यांची मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा शहरात. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी मेळघाटात येण्याचे आश्वासन या आदिवासींना दिले, हे विशेष...

Previous Post Next Post