श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात जिल्हास्तरीय बिजनेस आयडिया स्पर्धा महिला उद्योजक मेळावा संपन्न...


 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात जिल्हास्तरीय बिजनेस आयडिया स्पर्धा महिला उद्योजक मेळावा संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

रुबल फाउंडेशन व श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय मध्ये जिल्हास्तरीय बिजनेस आयडिया स्पर्धा आणि महिला उद्योजक मेळावा संपन्न. कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल जयस्वाल, सचिव अनुप पुराणिक यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश माई,प्रा.डॉ. प्रवीण डाबरे, रुबल फाउंडेशनचे संस्थापक संचालक डॉ. कुलदीपसिंह राजपूत, प्रेमसिंह राजपूत तसेच प्राचार्य डॉक्टर करणसिंह राजपूत यांची विशेष उपस्थिती होती. महिला उद्योजकतेतून खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताची उभारणी शक्य, श्रावणी नेतृत्व क्षमतेला योग्य पाठबळ दिल्यास स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल असे प्रास्ताविक डॉ. कुलदीप सिंह राजपूत यांनी केले. महिलांनी पुरुषप्रधान मानसिकतेचे बंधन जुगार उद्योग क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येऊन, संघर्षाला घाबरू नये आणि समाजातील प्रत्येक घटकांनी विशेषता पुरुषांनी महिलांना सक्रिय पाठवून द्यावे असे आवाहन अध्यक्षीय भाषणात अनिल जयस्वाल यांनी व्यक्त केले. जळगाव शिक्षक संस्थेचे सचिव अनुप पुराणिक यांनी महिलांची संवाद साधत आपल्या उद्योजकीय प्रवासाचे अनुभव मांडले. दुसरे सत्र पूजा म्हात्रे आणि खादी ग्रामोद्योगचे प्रतिनिधी प्रसाद काठोले यांनी संयुक्तपणे घेतले. या सत्रात महिलांसाठी आर्थिक साक्षरता, कर्ज प्रक्रिया, शासकीय योजना, आर्थिक शिस्त आणि निधी व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.उद्योग मेळाव्यात ८६ महिलांनी आणि ४० महाविद्यालयीन तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जिल्हास्तरीय बिझनेस–आयडिया स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांतील २६ महिला उद्योजक आणि ३ महाविद्यालयीन तरुणींनी सहभाग घेतला.स्पर्धेचे परीक्षक म्हणून महाविद्यालयाच्या अर्चना जोशी,नीलिमा भोपळे,संतोष कतोरे तर रुबलच्या ज्ञानेश्वर लाटे,पूजा म्हात्रे यांनी काम पाहिले. उद्योगातील नाविन्य, कल्पकता, परिणामकारक सादरीकरण, बाजारपेठेची समज, मार्केटिंग कार्यनिती एकूण मांडणी या निकषांच्या आधारे विजेते निवडण्यात आले.स्पर्धेत सविता संजय देशमुख यांनी प्रथम क्रमांक ,रजनी उमेश वेरूळकर यांनी द्वितीय,पुजा सुधीर देशमुख यांनी तृतीय, उज्वला कैलास वानखडे यांनी चौथा तर अलका रमेश येऊल यांनी पाचवा क्रमांक मिळविला.यावेळी दीक्षा राहुल वाघोदे,जयश्री सारंग असतकर आणि शोभा गोमासे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.पारितोषिक वितरण अनिल जयस्वाल,अनुप पुराणिक, डॉ.गिरीश मायी आणि ज्योती राजपूत यांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमास रुबलच्या अरुणा देशमुख व  शरीफा मासरे यांचेसह कॉलेजच्या स्वयंसेविकांनी  परिश्रम घेतले.

Previous Post Next Post