जळगाव जामोद प्रतिनिधी...
संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा फुले कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खेर्डा ता. जळगाव जामोद चे राष्ट्रीय योजना शिबिर दत्त ग्राम वडशिंगी येथे पार पडले. या सात दिवशीय श्रमसंस्कार शिबिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देणारे विषय शिबिरामध्ये ठेवण्यात आले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आरोग्य तपासणी शिबिर, स्त्री भ्रूण हत्या, सामाजिक एकोपा अशा अनेक कार्यक्रमांची शिबिरामध्ये रेलचेल होती. या शिबिराला राष्ट्रीय सेवा योजनेचे बुलढाणा समन्वयक प्रा.नीलकंठ राठोड सर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच प्रसिद्ध साहित्यिक सागर झणके यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. या शिबिरातून सुसंस्कृत नागरिक घडावा हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या सात दिवशी श्रमसंस्कार शिबिरांला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या त्यामध्ये अविनाश उमरकर, संजय उमरकर,ज्ञानेश्वर उमरकर, सरपंच शितलताई वानखडे, सुनील वानखडे, प्राचार्य बोंबटकार, मुख्याध्यापक पालकर, धर्माळ सर, मधुकर भगत, राजेश वाघ यांच्यासह इतर मान्यवर पाहुण्यांचे उपस्थिती होती. असे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा संतोष जाधव यांनी कळविले आहे.
