आर सी २४ न्युज नेटवर्क...
जळगाव जामोद नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ (ब) मधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ. इंगळे लता गजानन यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. “जनसेवेचा नवा अध्याय” या संकल्पनेतून त्या मतदारांशी थेट संवाद साधत असून, त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने लढण्याची भूमिका हीच त्यांची ओळख आहे. महिलांच्या प्रश्नांपासून ते मूलभूत नागरी सुविधांपर्यंत सर्वसमावेशक विकासाचा त्यांचा ठाम निर्धार असून, प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या विषयांवर त्यांनी विशेष भर दिला आहे.
शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर मत देण्याचे आवाहन करत, “जनतेच्या हक्कासाठी सक्षम व कर्तव्यदक्ष प्रतिनिधी निवडा” असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या पाठीशी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उभे असून प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत आहे.मतदान शनिवार, २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे.
