नागपूर येथील उपजीविका संस्थेचा स्तुत्य उपक्रम..सोमवार खेडा येथील विद्यार्थ्यांना रंग साहित्य व मातांना साडीचोळी भेट...


 नागपूर येथील उपजीविका संस्थेचा स्तुत्य उपक्रम..सोमवार खेडा  येथील विद्यार्थ्यांना रंग साहित्य व मातांना साडीचोळी भेट...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा सोमवारखेडा येथील सर्व विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना उपजिवीका संस्था नागपूर यांचे वतीने रंगसाहित्य व मुलांच्या घडवणित मोलाचा वाटा असणाऱ्या  सर्व विद्यार्थ्यांच्या आईंना, तसेच गावातील महीला बचतगट, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर, महीला ग्राम पंचायत सदस्या यांना भाऊबिजेची भेट म्हणून साडी - चोळी भेट म्हणून देण्यात आली . याप्रसंगी उपजीविका संस्थेचे सर्व पदाधिकारी गावातील पुरुष व महिला यांनी गावाच्या वेशीवर जोरदार स्वागत करून पारंपारिक आदिवासी नृत्य 'गदली ' या नृत्य प्रकाराने वाजत गाजत शाळेपर्यंत आणण्यात आले.

  शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गावातील महिलांनी सर्व पाहुण्यांना ओवाळणी घातली . व उपजिवीका संस्थेच्या सर्व भावांनी या बहीणींना भाऊबिजेची भेट दिली.शाळेचे मुख्याध्यापक राजीव खोजरे यांचे प्रयत्नातून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात  सरपंच मन्साराम ठाकरे, गटशिक्षणाधिकारी भटेसिंग गिरासे, संस्थेचे अध्यक्ष धिरज गलगले, सचिव   मार्कंडे, विलास कडू (कोषाध्यक्ष ), तुरणकर, पाठराबे, जवादे, बारहाते, उपसरपंच गंगुबाई शेलूकर,ग्रामपंचायत सदस्य ज्योती चव्हाण, ठाकरे,शिक्षण विस्तार अधिकारी अलका बोंडे, केंद्रप्रमुख सविता भास्करे,  विलासराव गणोरकर,पोलीस पाटील राजू काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीराम ठाकरे, सदस्य गोपाल खडके, माजी विदयार्थी संघ अध्यक्ष सोनकलाल ठाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष ठाकरे, सचिव रेखा पाखरे यांचेसह ग्राम पंचायतचे सर्व पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व शिक्षक शिक्षिका, अंगणवाडी सेविका, बचतगट सदस्या व गावातील महीला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलतांना संस्थेचे अध्यक्ष धिरज गलगले व कोषाध्यक्ष विलास कडू यांनी भावां कडून भाऊबिजेची भेट स्विकारल्या बद्दल तसेच सर्व मातांना आपल्या मुलांच्या भवितव्या बद्दल सतर्क राहून त्यांच्या सर्वांगीण विकासाचे आवाहन केले. 

याप्रसंगी बोलतांना चिखलदरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भटेसिंग गिरासे  यांनी आपल्या  मुलांना नियमित शाळेत पाठवून मुलांचे उज्वल भविष्य घडवावे. आई ही मुलाची जन्मदातीच नाही तर त्याच्या भविष्यात निर्माण होणाऱ्या उज्वल चित्राची चित्रकार आहे. तसेच भव्यदिव्य कार्यक्रम व विदयार्थी मित्रांना रंगसाहित्य व मातांना साडी चोळी भेट दिल्या बद्दल उपजिविका संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिक्षण विभागाच्या वतीने आभार मानले .व संस्थेच्या उत्तरोतर प्रगती करिता शुभेच्छा दिल्यात.अध्यक्ष पदावरून बोलतांना सरपंच मंसाराम ठाकरे म्हणाले की,   आमच्या गावात इतका मोठा आणि अतुलनिय कार्यक्रम पहील्यांदाच होत आहे. गावातील शाळा व अंगणवाडी विद्यार्थ्यांना साहीत्य भेट तर महिलांना साडी चोळी भेट दिल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष धिरज गलगले व सर्व पदाधिकाऱ्यांचे ग्रामपंचायत व गावकऱ्यांचे वतीने आभार मानले तर आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन घडवून आणल्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक राजीव खोजरे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक राजीव खोजरे यांनी, संचलन किशोर साखरकर तर आभार प्रदर्शन राजश्री देशमुख यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेंद्र वैदय, गणेश धांडे, शंकर बेठेकर, सुनिल राठोड, संगीता देशमुख, राजश्री देशमुख, तुलसी ठाकरे, गणेश ठाकरे, कविता ठाकरे,   शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्रीराम ठाकरे, सोनकलाल ठाकरे, गोपाल खडके, बचतगट अध्यक्ष बाली ठाकरे, अंगणवाडी सेविका  शेवंता दारसिंबे, अरुणा ठाकरे, व मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले .

Previous Post Next Post