ग्रामपंचायत चिचखेडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वनराई बंधारा बांधकाम....


 ग्रामपंचायत चिचखेडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वनराई बंधारा बांधकाम....

राजु भास्करे/अमरावती...

चिचखेडा (ता. चिखलदरा) येथे दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत चिचखेडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जलसंधारण व भूजल पातळी वाढीच्या उद्देशाने वनराई बंधारा बांधण्यात आला.सदर वनराई बंधाऱ्याच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी अडवून ठेवणे, भूजल साठा वाढविणे तसेच शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होणार आहे. जलसंधारणाच्या दृष्टीने हा उपक्रम गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणास चालना मिळून पाण्याचा योग्य वापर व साठवणुकीस मदत होणार असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी ग्रामपंचायत चिचखेडा मार्फत करण्यात येत आहे.ग्रामविकासासाठी अशा नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख कामांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासास गती मिळत आहे.

Previous Post Next Post