बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी...
भारतात दरवर्षी परदेशी विद्यार्थांना आयुर्वेद, योगा, युनानी आणि इतर प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी 104 प्रकारच्या शिष्यवृत्या देण्यात येतात. आतापर्यंत भारताने 26 देशांसोबत सामंजस्य करार केले आहे. जगातील 50 हुन अधिक संस्थेंसोबत सहयोग केला आहे. 15 विद्यापिठांमध्ये आयुष विभागाची स्थापना करण्यात आली आहे. 43 देशांमध्ये आयुष माहिती केंद्र स्थापन करण्यात आले आहे. युके मध्ये अश्वगंधा चाचणी, जर्मनीमध्ये गुडूचा अभ्यास आणि लातविया मध्ये मधुमेह (डायबेटीज) आयुर्वेदीक अभ्यासाचा समावेश आहे. हा अभ्यास प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाशी जोडला गेला आहे. जग हे कुटूंब आहे. या कुटूंबाच्या निरोगी आयुष्यासाठी भारत हा वचनबध्द आहे. सहयोगी देशांच्या सहकार्याने मतदीने आधुनिक विज्ञानाचा उपयोग करुन आयुष प्रणाली मजबुत करण्यासाठी काम करणार आहे. पारंपारीक औषधांचा उपयोग नागरीकांच्या निरोगी आरोग्य कल्याणासाठी करुया असा दृढ विश्वास आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी या शिखर परिषदेत मनोगत व्यक्त करतांना केला.
1)भारत नेपाळ आयुर्वेद सामायीक वारसा...
हिमालयातील आयुर्वेदीक, औषधी वनस्पतीचा उपयोग आणि प्राचीन ज्ञानाच्या माध्यमातुन जागतीक स्तरावर नाविण्यपुर्ण औषध निर्मीतीचे कार्य केल्या जाणार आहे. भारतीय आयुर्वेद आणि नेपाळच्या आरोग्य सुविधेमध्ये पारंपारीक औषधांचे एकत्रीकरण तसेच 150 आयुष शिष्यवृत्ती हे भागीदारीचे प्रतिक असुन भारत नेपाळ संबधांमध्ये नवि उर्जा प्रस्थापीत करण्याचे काम करणार आहे.
2)भारत श्रीलंका पारंपारीक औषधांमध्ये सहयोग..
भारत आणि श्रीलंकेचे संबंध आयुर्वेद आणि सिध्दा सारख्या सामायीक वैद्यकिय प्रणालीमध्ये खोलवर रुजले आहे. 1961 च्या आयुर्वेद कायदयाव्दारे श्रीलंकेने पारंपारीक ज्ञानाचे संस्थात्मीकरण केले आहे. हे संपुर्ण जगासाठी एक चांगले उदारण आहे. गेल्या काही वर्षात 78 श्रीलंकेच्या विद्यार्थांना आयुष शिष्यवृत्तीव्दारे प्रशिक्षण मिळाले आहे. हे भविष्यातील संशोधन आणि परस्पर सहकार्यांसाठी महत्वाचे आहे.

