अकोट रोटरी व्हिजनच्या वतीने आदिवासी आश्रम विद्यालयात त्वचारोग तपासणी व उपचार शिबिर संपन्न.....


 अकोट रोटरी व्हिजनच्या वतीने आदिवासी आश्रम विद्यालयात त्वचारोग तपासणी व उपचार शिबिर संपन्न.....

सय्यद शकिल/अकोट

जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे समाजात वावरताना काहीतरी समाजासाठी केले पाहिजे हे समोर ठेवून रोटरी क्लब ऑफ अकोट विजन द्वारे भव्य रोगनिदान व प्लास्टिक सर्जरी कॅम्प आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला रोटरी क्लब अकोला नॉर्थ आणि श्रीराम हॉस्पिटल अकोला यांचे विशेष सहकार्य लाभले. संयुक्तिकरित्या स्थानिक अकोट येथील आदिवासी आश्रम शाळा येथे या भव्य दिव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये प्लास्टिक सर्जरी व उपचार याकरिता अकोला येथील प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर मयूर अग्रवाल व त्वचारोग तज्ञ डॉक्टर श्रद्धा अग्रवाल यांनी आपल्या सेवा दिल्या.वीस पेशंटनी प्लास्टिक सर्जरीचा लाभ याप्रसंगी घेतला.तर दंत रोग तपासणी शिबिराकरिता अकोला येथील दंत तज्ञ डॉक्टर तुषार वोरा व डॉक्टर शकुन सराफ यांनी आपल्या सेवा दिल्या.

 जवळपास ६० पेशंट्स ला याचा लाभ झाला.तर महिला रोगनिदान शिबिर व उपचार मध्ये अकोट येथील महिला रोग तज्ञ डॉक्टर शितल गावंडे व डॉक्टर श्वेता येऊल यांनी आपल्या सेवा प्रदान केल्या ९५ महिलांची तपासणी याप्रसंगी डॉक्टर यांनी केली.तसेच डोळे तपासणी शिबिरामध्ये अकोट येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ  डॉक्टर दर्शन कुलट डॉक्टर विनोद वंजारा डॉक्टर अमर काळे यांनी आपल्या सेवा प्रदान केल्या १७५ रुग्णांनी याचा लाभ घेतला तसेच रोगनिदान व उपचार शिबिरामध्ये अकोट येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर ऋषिकेश येऊल व डॉक्टर मयूर व्यवहारे यांनी आपल्या सेवा प्रदान केल्या यामध्ये १२० पेशंटने लाभ घेतला त्वचारोग व उपचार  या शिबीरात १७० रुगणांवर तपासून त्याना मार्गदर्शन अकोट येथील प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉक्टर आरती अंबळकार यांनी केले.या प्रकारे विविध रोगांचे निदान व उपचार याचा जवळपास ६०० लोकांनी लाभ घेतला या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे गरजु रुगणांना मोफत औषधोपचार करुन त्यंना औषधेही दिली.असा भव्य व दिव्य महारोग तपासणी  शिबिर व प्लास्टिक सर्जरी कॅम्पच्या आयोजन आमचे मार्गदर्शक रो.नंदकिशोर शेगोकार असिस्टंट गव्हर्नर यांच्या मार्गदर्शनात माजी अध्यक्ष रो.संजय बोरोडे रो.अनंता काळे यांच्या विशेष सहकार्याने अध्यक्ष रो.आनंद भोरे,रो.अतुल मालाणी सचिव यांच्या नेतृत्वात प्रकल्प प्रमुख म्हणून रो.चेतन उपासे तर सहप्रकल्प प्रमुख म्हणून रो. दिलीप काटोले सर यांनी विशेष मेहनत घेतली.या प्रकल्पात रोटरी क्लब ऑफ अकोट व्हिजन चे सर्व सदस्य रो. शिरीष भाई बंजारा, अरुण हिंगणकर ,संदिप भुस्कट, अभिजीत अग्रवाल, सचिन मारू ,बिहाडे सर बाबुरावजी झामरे, उमेश पवार ,मंगेश चिखले, स्वाती चिखले, किरण गुहे संजय पवार तर रोटरी क्लब अकोला नॉर्थ चे  सचिव महेश बाहेती, गोपाल अग्रवाल  व रोटरी क्लब आकोट विजन आणि रोटरी क्लब अकोला नॉर्थ चे सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते

Previous Post Next Post