जळगाव जामोद प्रतिनिधी....
आज दि. ६ डिसेंबर २०२५ श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांनी श्रद्धासुमन अर्पण करण्यात आले.ग्रंथालय विभागातर्फे भव्य ग्रंथ प्रदर्शनी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ विशेष ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन केले होते. प्रदर्शनीचे उद्घाटन प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून केले. याप्रसंगी प्रा. गवई, प्रा. डॉ. निलेश निंबाळकर, प्रा. चव्हाण, प्रा डॉ. ऋषिकेश विप्रदास, ग्रंथपाल कतोरे, प्रा. अर्चना जोशी, ग्रंथालय परिचर प्यारेलाल डाबेराव, प्रा. बावस्कर, प्रा. उमरकर, प्रा. उनडकट, प्रा. धर्माळ आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथ प्रदर्शनीत मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषेतील विविध विषयांवरील पुस्तके मांडण्यात आली होती. यात भारतीय राज्यघटना, महापुरुषांची चरित्रे, कादंबऱ्या, नाटके, कथा, शेती, व्यवसाय, धार्मिक ग्रंथ, वाणिज्य, क्रीडा, संदर्भ ग्रंथ, तत्त्वज्ञान, स्पर्धा परीक्षा, इतिहास, संगणक, समाजशास्त्र आदी विषयांवरील मौल्यवान पुस्तकांचा समावेश होता. वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने श्रद्धांजली राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीनेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. गिरीश मायी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलेश निंबाळकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी एकत्रितपणे श्रद्धासुमने अर्पण केली.कनिष्ठ महाविद्यालयातही भावपूर्ण कार्यक्रम कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. जी. एस. वानखेडे, प्रा. देवकर यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून महामानवाला विनम्र अभिवादन केले.या सर्व कार्यक्रमांमधून महाविद्यालय परिवाराने बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपण्याचा व त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प पुन्हा एकदा व्यक्त केला.
