सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे 10 वी च्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा...


 सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे 10 वी च्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ कार्यक्रम  मोठ्या उत्साहात साजरा... 

संग्रामपूर तालुका प्रतिनिधी...

"पाखरं भुर्रकन उडून जातील, आकाशाला गवसणी घालतील,

पण घरट्याची ओढ मात्र, कायम त्यांच्या मनात राहील.

तुम्ही कितीही मोठे झालात, यशाच्या शिखरावर गेलात,

तरी आमच्यासाठी तुम्ही, लहान मुलेच राहाल...सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे दिनांक 12 /02/2026 रोजी 10 वी च्या विद्यार्थ्यांचा बोर्ड च्या परीक्षेसाठीचा सदिच्छा समारंभ घेण्यात आला.यावेळी शाळेचे अध्यक्ष माननीय डॉ. किशोर केला सर तसेच शाळेच्या मुख्य संयोजिका माननीय डॉ. सौ स्वाती किशोर केला मॅडम यांच्या प्रमुख मार्गदर्शनात शाळेचे प्राचार्य घाटोळे सर उपप्राचार्य कोकाटे सर व शाळेच्या पर्यवेक्षिका सौ ज्योती येउतकार मॅडम व पल्लवी मानकर मॅडम तसेच 10 वी च्या वर्गाला शिकविणारे सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात  विघ्नहर्ता गणेश व विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. वर्ग 10 मधील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील अनुभव व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेच्या मुख्य संयोजिका डॉ सौ स्वाती केला मॅडम यांनी 10 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे अध्यक्ष डॉ किशोरजी केला सर यांनी  बोर्ड परीक्षेसाठी मार्गदर्शन करत पुढील वाटचाली साठी सदिच्छा दिल्या . वर्ग 10 वी च्या वर्गशिक्षिका सौ मनीषा ढगे मॅडम यांनी या कार्यक्रमाचे आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रेरित केले व शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  रुपाली पालीवाल मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे  प्रस्ताविक रामदास धुर्डे सर यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महेंद्र टोपरे सर यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Previous Post Next Post