मुस्लिम समाजाने केली 5 टक्के पूर्ण आरक्षण पुनर्स्थापनेची मागणी...


 मुस्लिम समाजाने केली 5 टक्के पूर्ण आरक्षण पुनर्स्थापनेची मागणी...

जळगाव जामोद प्रतिनिधी:-

जळगाव जामोद येथील सकल मुस्लिम समाजाच्या युवकांच्या वतीने  राज्यातील मुस्लिमांना शिक्षण व शासकीय नोकरीत पूर्वीप्रमाणे 5 टक्के पूर्ण आरक्षण तातडीने पुनर्स्थापित करण्याची मागणी करण्यात आली आहे. सन 2014 मध्ये महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण जाहीर केले होते. त्यानंतर या निर्णयावर न्यायालयात याचिका दाखल झाली. Bombay High Court यांनी शासकीय नोकरीतील आरक्षणास स्थगिती दिली होती, मात्र शिक्षणातील आरक्षण कायम ठेवले होते. मात्र आता भाजपा सरकारा नी एका शासन निर्णयानुसार मुस्लिम आरक्षण पुर्णपणे रद्द केले आहेत. समाजाच्या वतीने राज्यपालांना निवेदन देऊन शिक्षण व नोकरीतील 5 टक्के पूर्ण आरक्षण पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मुस्लिम समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा नव्याने सर्वेक्षण करण्याचीही मागणी करण्यात आली.यावेळी सय्यद मोईन, आरबाज खान, लाईक देशमुख सर, सैय्यद अल्तमश, जुनेद शेख, शानवाज अहेमद, शहबाज खान, मोहमद उबैद, शेख शहजाद, इरफान खान व इतर मुस्लिम युवा उपस्थित होते‌.

Previous Post Next Post