बी.एस. पटेल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे हाशमपूर येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन...


 बी.एस. पटेल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे हाशमपूर येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

पिंपळगाव काळे येथील बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारा विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक ०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२६ यादरम्यान दत्तग्राम हाशमपूर येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन ०९ फेब्रुवारी रोजी सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल यांच्या मार्गदर्शनाने व  संस्थेचे सहसचिव रब्बानी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शत्रुघ्न जाधव यांच्या अनुभवी नेतृत्वामध्ये, वडगाव गड चे उपसरपंच एकनाथजी निंबाळकर यांच्या हस्ते, भगवानरावजी ताकोते, सुपडाजी ताकोते, इमामखा मालवणकर यांच्या उपस्थिती मध्ये पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर जांभळे यांनी शिबिरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. एकनाथजी निंबाळकर यांनी उद्घाटकीय भाषणामध्ये शिबिरार्थींना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर डॉ. शेख फराह, डॉ. महेश नेतनस्कर, सिराजोद्दीन बापुमिया पटेल विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय राजन्देकर यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. सानिया नाझ पटेल, प्रगती गायकवाड या शिबिरार्थींनी मनोगते व्यक्त केली. रब्बानी देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणातून पाणलोट व्यवस्थापन क्षेत्रातील त्यांचे अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर जांभळे तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपाली सिरसाट यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ . फराह शेख, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चेतन पलन, डॉ. महेश नेतनस्कर, प्रा. नितीन आसोले, जोया मॅडम, शबाना मॅडम, ताकोते मॅडम, नवाज देशमुख  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Previous Post Next Post