जळगाव जामोद प्रतिनिधी....
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयात दि.04/02/2026 बुधवार रोजी वर्ग 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.गिरीश मायी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.जी.एस.वानखेडे,अधिक्षक संजय गाडेकर, वरिष्ठ महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा . गिरीश कुलकर्णी,कनिष्ठ महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.राजीव देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप्रज्वलन ,सरस्वती पुजन, संत गाडगेबाबांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.मान्यवरांच्या स्वागतनंतर प्रास्ताविक प्रा. गणेश जोशी यांनी केले.यानंतर सत्र 2025—26 मधील विविध स्पर्धा तसेच वार्षिक स्नेहसंमेलन "युवोत्सव "मधील स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम पारितोषिक, प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला.पारितोषिका चे वाचन प्रा.गणेश जोशी व प्रा.रामेश्वर सायखेडे यांनी केले.वर्ग 12 वी च्या कु.गौरी लोखंडे, मयुरी गिरी, दिव्या अहिर, पूनम काटे, मुस्कान तडवी, स्नेहा इंगळे , आचल खंडेराव, तसेच हर्षल राठोड, प्रणव हागे या विद्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाबाबत गौरवोद्गार काढले.आणि काही विद्यार्थिनींचे डोळे महाविद्यालयातील चांगल्या आठवणींनी अक्षरशः पाणावले , येथे मिळालेले ज्ञान, संस्कार , आमच्या भविष्यातील प्रगतीसाठी ची प्रेरणा आहे असे विचार मांडले.यानंतर प्रा.राजीव देवकर यांनी विद्यार्थ्यांमधील विशेष गुणांचा उल्लेख करीत, स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी नित्य प्रयत्नरत राहण्याचे आवाहन केले.प्रा.जी.एस.वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यश मिळवा असे सांगितले.अधिक्षक संजय गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.गिरीश मायी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन प्रा. गणेश जोशी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. विनोद बावस्कार यांनी केले,कार्यक्रमासाठी वर्ग 12 वी,11 वी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर लगेच सर्व विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला, अशा प्रकारे काहीसा भावनाप्रधान, हसत खेळत कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमासाठी प्रा.ऋषीकेश कांडलकर, प्रा. निलिमा भोपळे, समाधान निलजे, गजानन वानखडे, बाबुराव चव्हाण हर्षद धर्मे, योगेश तायडे, मानसी कुलकर्णी मॅडम,वरीष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी बंधू, विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
