बी. एस. पटेल महाविद्यालयामध्ये संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री वर आधारित उद्बोधन कार्यक्रम संपन्न...


 बी. एस. पटेल महाविद्यालयामध्ये संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री वर आधारित उद्बोधन कार्यक्रम संपन्न...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथका द्वारा, सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था, पळशी वैद्य चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲड. सलिम पटेल, सहसचिव श्री. रब्बानी देशमुख, संचालक श्री कयूम पटेल व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शत्रुघ्न जाधव यांच्या मार्गदर्शनाने दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दशसूत्री वर आधारित उद्बोधन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. शेख फराह होत्या. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रा. बाबाराव सांगळे यांनी विद्यार्थ्यांना गाडगे बाबा यांचे कार्य समजावून सांगितले त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर जांभळे यांनी विद्यार्थ्यांना दशसूत्रीवर आधारित मार्गदर्शन केले. डॉ . फराह शेख यांनी विद्यार्थ्यांना गाडगे बाबा यांच्या विचारांचे पालन करून समाजकार्य करण्यास प्रोत्साहित केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका कु. प्रगती इंगळे तर आभार प्रदर्शन कु. प्रगती गायकवाड हिने केले.  कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नूर मोहम्मद व डॉ. चेतन पलन तसेच डॉ. निखिल अग्रवाल, प्रा. नितीन असोले, डॉ. दिपाली सिरसाट तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post Next Post